वेगवेगळ्या घटनेत दोन मोटार सायकल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 11:23 IST2019-05-22T11:23:01+5:302019-05-22T11:23:14+5:30
नंदुरबार : नंदुरबार व अक्कलकुवा येथील वेगवेगळ्या घटनेत दोन मोटर सायकल लंपास करण्यात आल्या आहेत़ याबाबत अज्ञातांविरुध्द गुन्हा दाखल ...

वेगवेगळ्या घटनेत दोन मोटार सायकल लंपास
नंदुरबार : नंदुरबार व अक्कलकुवा येथील वेगवेगळ्या घटनेत दोन मोटर सायकल लंपास करण्यात आल्या आहेत़ याबाबत अज्ञातांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
नंदुरबार येथील पहिल्या घटनेत फिर्यादी दिगंबर तुकाराम माळी (४४) रा़ तळोदा रोड, नंदुरबार यांच्या मालकीची मोटरसायकल अज्ञाताने नंदुरबार बसस्थानकावरुन चोरुन नेली़ ३० हजार रुपये किमतीची मोटारसायकल असल्याचे फिर्यादीत नमूद आहे़ दरम्यान, याबाबत अज्ञाताविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हादाखल करण्यात आला आहे़
दुसऱ्या घटनेत गंगापूर ता़ अक्कलकुवा येथून निलेश आनंद वळवी (२५) रा़ अमोदा ता़ उच्छल जि़ तापी यांच्या मालकीची २५ हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञाताकडून लांबवण्यात आली़ याबाबत अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़