नंदुरबार जिल्ह्यात आणखी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 22:18 IST2020-06-14T22:17:03+5:302020-06-14T22:18:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढण्यास सुुरुवात झाली असून रविवारी रात्री उशिरा दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले ...

Two more reports in Nandurbar district are positive | नंदुरबार जिल्ह्यात आणखी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह

नंदुरबार जिल्ह्यात आणखी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढण्यास सुुरुवात झाली असून रविवारी रात्री उशिरा दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ यातील एक ‘त्या’ वरिष्ठ अधिकाऱ्याचा धुळे येथील वाहनचालक आहे़
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मंदाणे ता़ शहादा येथील महिला आणि धुळे येथील ३१ वर्षीय वाहनचालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़ पैकी ३१ वर्षीय चालक यापूर्वीच क्वारंटाईन आहे़ संबधित चालक हा बांधकाम विभागाच्या कोरोनाबाधित अधिकाºयाच्या संपर्कात आला होता़ दरम्यान मंदाणे येथील महिलेला आयसोलेशनमध्ये दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून मंदाणे येथे संपर्काचा शोध घेऊन फवारणी केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़

दरम्यान लोणखेडा, ता.शहादा येथे मुंबई रिटर्न वृद्धाचा झालेला मृत्यू व मोलगी येथे संशयीत रुग्णाला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याने दोन्ही ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यांच्या संपर्कातील ९ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, नंदुरबार येथील नगरसेवकाच्या जेवनावळीत जेवन तयार करणारा कथीत खानसामा स्वत: पाच दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आढळला आता त्याच्या कुटूंबातील पाच जणही पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

Web Title: Two more reports in Nandurbar district are positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.