बनावट लग्नप्रकरणी आणखी दोघांना अटक, मुख्य सूत्रधार मात्र फरारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:23 IST2021-05-28T04:23:27+5:302021-05-28T04:23:27+5:30
शहादा तालुक्यातील मंदाणे येथील युवक भूषण संतोष सैंदाणे याच्याशी बनावट लग्न लावून फसवणूक करून आर्थिक लूट केल्याप्रकरणी शहादा पोलीस ...

बनावट लग्नप्रकरणी आणखी दोघांना अटक, मुख्य सूत्रधार मात्र फरारच
शहादा तालुक्यातील मंदाणे येथील युवक भूषण संतोष सैंदाणे याच्याशी बनावट लग्न लावून फसवणूक करून आर्थिक लूट केल्याप्रकरणी शहादा पोलीस स्टेशनला नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी सहा जणांना यापूर्वीच अटक झाली आहे. अन्य तीन आरोपी प्रीति कांबळे, मुलीचा भाऊ भैरव शिंदे व मुख्य सूत्रधार बाबाराव आमले राहणार औरंगाबाद हे फरार आहेत. त्यांच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुरेश सोनवणे यांनी सहकाऱ्यांच्या पथकासह स्थानिक पोलिसांची मदत घेऊन हिंगोली जिल्ह्यात सापळा रचून प्रीति कांबळे व मुलीचा भाऊ यांना शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून मंदाणे येथील लग्नाचे वधूला दिलेले दागिने व दिलेल्या रोख रकमेपैकी दहा हजार रुपये रोख असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. मुख्य सूत्रधार बाबाराव आमले याचा कसून तपास सुरू आहे. अटकेतील सर्व आठही आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी वाढविण्यात आली आहे.