चोरी केलेले मोबाईल विक्रीच्या प्रयत्नातील दोघे अल्पवयीन मुले पोलीसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 12:33 IST2019-10-02T12:33:02+5:302019-10-02T12:33:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बागवान गल्लीतून पाच महागडे मोबाईल चोरी करुन त्यांची विक्री करण्याच्या उद्देशाने फिरणा:या दोघा अल्पवयीन ...

चोरी केलेले मोबाईल विक्रीच्या प्रयत्नातील दोघे अल्पवयीन मुले पोलीसांच्या ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बागवान गल्लीतून पाच महागडे मोबाईल चोरी करुन त्यांची विक्री करण्याच्या उद्देशाने फिरणा:या दोघा अल्पवयीन मुलांना पोलीस पथकाने ताब्यात घेतल़े स्थानिग गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली़
विधानसभा निवडणूकांच्या पाश्र्वभूमीवर एलसीबीचे पथक शहरात गस्त करत आह़े दरम्यान 25 सप्टेंबर रोजी साक्री नाका भागात दोघे अल्पवयीन मुले अत्यंत कमी किमतीत महागडे मोबाईल विक्री करत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती़ त्यानुसार पथकाने त्यांचा शोध घेतला असता दसेरा मैदानाजवळ दोन मुले संशयित स्थितीत आढळून आली होती़ त्यांची चौकशी केली असता, त्यांनी पथकातील कर्मचा:यांना उडवाउडवीची उत्तरे देत पळ काढण्याचा प्रयत्न केला होता़ पथकाने दोघांना ताब्यात घेत एलसीबीच्या कार्यालयात नेऊन चौकशी केली असता बागवान गल्लीतून 3 ते 4 दिवसांपूर्वी रात्रीच्यावेळी घरात घुसून मोबाईल व रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दोघांनी दिली़ त्यांनी 36 हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल पथकाला काढून दिल़े त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आह़े पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस नाईक प्रमोद सोनवणे, पुष्पलता जाधव, राकेश मोरे, पोलीस कॉन्स्टेबल मोहन ढमढेरे, विजय ढमढेरे, आनंदा मराठे, अभय राजपूत, किरण मोरे, पंकज महाले यांनी ही कारवाई केली़
पथकास पोलीस अधिक्षक पंडीत यांनी रोख बक्षिस जाहिर केले आह़े