शहाद्यात बंद घरातून दोन लाखांची चोरी
By Admin | Updated: June 26, 2017 14:38 IST2017-06-26T14:38:00+5:302017-06-26T14:38:00+5:30
भीतीचे वातावरण : कल्पनानगरातील घटना

शहाद्यात बंद घरातून दोन लाखांची चोरी
ऑनलाईन लोकमत
शहादा,दि.26 - शहरातील कल्पनानगर परिसरात रविवारी पहाटे घरफोडी करून सुमारे दोन लाखांचा ऐवज लंपास केल्याने शहरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
कल्पनानगरातील विशाल चुनिलाल पटेल यांच्या बंद घराचा कडीकोंडा तोडून घरफोडी झाली. घरातून चोरटय़ांनी पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, चार तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, साडेतीन तोळे वजनाचे सोन्याची गळ्यातील पेंडल, एक तोळे वजनाचे कानातील झुमके, एक मोबाईल व रोख दीड हजार रुपये असा एकूण एक लाख 82 हजारांचा ऐवज लंपास केला. सकाळी शेजारी राहणारे विशाल पटेल यांचे भाऊ मंगेश चुनीलाल पटेल यांना ही घटना लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून शहादा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.