दोन लाखाचे सागवान व फर्निचर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 12:15 IST2020-02-12T12:14:39+5:302020-02-12T12:15:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : वनविभागाच्या नवापूर येथील पथकाने शहराजवळ विजापूर शिवारात छापा टाकुन सुमारे दोन लाख रुपये किमतीचा ...

Two lakh teak and furniture seized | दोन लाखाचे सागवान व फर्निचर जप्त

दोन लाखाचे सागवान व फर्निचर जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : वनविभागाच्या नवापूर येथील पथकाने शहराजवळ विजापूर शिवारात छापा टाकुन सुमारे दोन लाख रुपये किमतीचा सागवानी प्लायवूड व तयार फर्निचर जप्त करुन एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नवापुर तालुक्यातील विजापूर येथे अवैध लाकूड आणि फर्निचर असल्याची माहिती मंगळवारी वनविभागाला मिळाली होती़ त्यानुसार सहायक वनसंरक्षण जी़आऱ रणदिवे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी प्रथमेश हाडपे, वनपाल प्रकाश मावची, डी.के. जाधव, वनरक्षक सतीश पदमर, प्रशांत सोनवणे, कल्पेश अहिरे, भगवान साळवे, माजी सैनिक रवींद्र कासे यांच्या पथकाने विजापूर पाहणी केली होती़ दरम्यान गावातील विनायक गावीत यांच्या घराची झडती घेतली असता, त्यात घरात मोठ्या प्रमाणात अवैध साग चौपाट व रंधायंत्र, डिझाईन यंत्र, सुतार कामाचे साहित्य व तयार सोफासेट, बॉक्स पलंग आढळून आले. एकूण १२२ साग साईज नग २.३१६ घनमीटर लाकूड असा माल आढळून आला. हे लाकूड जप्त करून नवापुर येथील वनविभागाच्या शासकीय काष्ठ आगारात जमा करण्यात आले़ गुन्ह्याकामी वनक्षेत्रपाल यांनी प्रथम अहवाल जारी करुन एका संशयिताविरूध्द गुन्हा नोंद केला. जप्त मालाची किंमत सुमारे दोन लाख रुपये आहे.
ही कारवाई नंदुरबार येथील शहादा उपवनसंरक्षक एस़बीक़ेवटे, सहायक वनसंरक्षक जी़आऱ रणदिवे दक्षता विभागाचे विभागीय वन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली़ या गुन्ह्याचा तपास वडकळंबीचे वनपाल दिपक जाधव करत आहेत़

Web Title: Two lakh teak and furniture seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.