दोन वेगवेगळ्या अपघातात दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 21:44 IST2020-12-13T21:44:25+5:302020-12-13T21:44:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या अपघातात दोनजण ठार झाल्याची घटना उमर्दे, ता.नंदुरबार व रोझवा, ता.तळोदा येथे ...

दोन वेगवेगळ्या अपघातात दोन ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या अपघातात दोनजण ठार झाल्याची घटना उमर्दे, ता.नंदुरबार व रोझवा, ता.तळोदा येथे घडली.
नंदुरबार ते उमर्दे रस्त्यावर भरधाव जाणाऱ्या रिक्षाने (क्रमांक एमएच ३९-जे३०३२) कैलास देविदास जगदाळे (३७) रा.कोपर्ली, ता.नंदुरबार यांना जबर धडक दिली. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ११ रोजी सायंकाळी पाच वाजता ही घटना घडली. घटना घडल्यानंतर चालक तेथून पसार झाला. चालक भुवनेश्वर सुरेश जोहरी यांनी दारुच्या नशेत भरधाव रिक्षा चालविल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. याबाबत योगेश देविदास जगदाळे यांनी फिर्याद दिल्याने भुवनेश्वर सुरेश जोहरी यांच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास फौजदार कमलाकर चौधरी करीत आहे.
दुसरी घटना तळोदा तालुक्यातील राणीपूर ते रोझवा रस्तावर घडली. भरधाव दुचाकी घसरल्याने हा अपघात झाला. त्यात विनायक अर्जून पाडवी (३५) रा.रोझवा यांचा मृत्यू झाला. दुसरी घटना महिनाभरापूर्वी घडली. विनायक पाडवी हे आपल्या दुचाकीने (क्रमांक एमएच ३९-एबी ४५७५) जात असतांना अपघात झाला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना सुरत येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार घेतांना त्यांचा मृत्यू झाला. बाबत पोलीस नाईक विनोद नाईक यांनी फिर्याद दिल्याने तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.