दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार, दोनजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 12:38 IST2019-12-22T12:38:30+5:302019-12-22T12:38:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात दोनजण ठार तर दोनजण जखमी झाल्याची घटना पातोंडा, व अनरद ...

Two killed, two injured in two separate accidents | दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार, दोनजण जखमी

दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार, दोनजण जखमी


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात दोनजण ठार तर दोनजण जखमी झाल्याची घटना पातोंडा, व अनरद येथे घडली.
पहिली घटना पातोंडा, ता.नंदुरबार येथे घडली. वर्षा गणेश नाईक (२१) रा.करणखेडा, ता.नंदुरबार असे मयताचे नाव आहे. गणेश नाईक हा जखमी झाला आहे. दहिंदुले रस्त्याकडून नंदुरबारकडे येत असतांना प्रकाशाकडून येणाऱ्या भरधाव ट्रकने (क्रमांक एमपी ०९-एचजी २४७१) दुचाकीला जबर धडक दिली. त्यात वर्षा नाईक यांना जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. दुसरी घटना अनरदबारी, ता.शहादा येथे घडली. कोहºया कृष्णा तडवी (३२) रा.अंबापाणी, ता.शहादा असे मयताचे नाव आहे. शिवाजी तडवी हा जखमी झाला. भरधाव ट्रकने तडवी यांच्या दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला.

Web Title: Two killed, two injured in two separate accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.