नंदुरबार नजीक अपघातात दोन ठार, दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 12:58 IST2020-05-17T12:58:44+5:302020-05-17T12:58:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार-रनाळा रस्त्यावर काठोबा देवस्थानजीक कार व पीकअप वाहन यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात दोनजण जागीच ...

नंदुरबार नजीक अपघातात दोन ठार, दोन जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबार-रनाळा रस्त्यावर काठोबा देवस्थानजीक कार व पीकअप वाहन यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात दोनजण जागीच ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली.
याकूब प्रताप गावीत व सुलेमान गावीत रा.नवापाडा, ता.नवापूर असे मयतांची नावे आहेत तर सोनिया गावीत व पल्लवी गावीत या जखमी झाल्या. नंदुरबारकडून दोंडाईचाकडे जाणाऱ्या कारला समोरून येणाºया पीकअप वाहनाने जबर धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की दोन जणांचा त्यात दाबून जागीच मृत्यू झाला. दोन जण जखमी झाले.
रस्त्याने जाणाºया वाहनचालकांनी रुग्णवाहिकेला फोन केल्यानंतर जखमी व मयत यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात अपघातान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक या अपघातामुळे काही काळ ठप्प झाली होती.