ट्रकची दुचाकीला धडक, दोनजण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 12:27 IST2020-03-03T12:27:22+5:302020-03-03T12:27:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शिरपूर येथून देवमोगरा मातेच्या दर्शनासाठी जात असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने मोटारसायकलला धडक ...

Two killed in truck collision | ट्रकची दुचाकीला धडक, दोनजण ठार

ट्रकची दुचाकीला धडक, दोनजण ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शिरपूर येथून देवमोगरा मातेच्या दर्शनासाठी जात असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने मोटारसायकलला धडक दिली. त्यात दोघांना रुग्णालयात आणत असताना मृत्यू झाला. रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास डामरखेडा गावाजवळ घटना घडली.
सिंधूबाई विजय पावरा (२२) व निकिता दिनेश पावरा (साडेसात वर्ष) असे मयतांची नावे आहेत. अपघातानंतर ट्रक चालक ट्रक सोडून फरार झाला असून शहादा पोलिसात अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रानुसार, विजय पावरा (रा.घोटाळी, ता.शहादा, ह.मु.शिरपूर) हे आपल्या कुटुंबीयांसह मोटारसायकलीने (क्रमांक एम.एच.१८-७५६३) शिरपूर येथून देवमोगरा येथे याहामोगी देवीच्या दर्शनाला जात होते. डामरखेडा गावालगत मागून भरधाव वेगाने येणाºया ट्रकने (क्रमांक जी.जे.२७ जे-३०१०) जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलवरील सिंधूबाई विजय पावरा (२२) व निकिता दिनेश पावरा (साडेसात वर्ष) गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेत असतांना त्यांचा मृत्यू झाला. विजय पावरा यांना किरकोळ दुखापत झाली.
घटनेची माहिती कळताच ग्रामस्थ गोळा झाले. जखमींना गावातील खासगी वाहनाने शहादा येथील पालिका रुग्णालयात आणले असता त्यांच्या मृत्यू झाला.
दिनेश प्रेमसिंग पावरा यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ हे करीत आहेत.

Web Title: Two killed in truck collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.