ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 11:49 IST2019-09-19T11:49:25+5:302019-09-19T11:49:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना बर्डीपाडा, ता.नवापूर नजीक 17 ...

Two killed in truck collision | ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना बर्डीपाडा, ता.नवापूर नजीक 17 रोजी सायंकाळी उशीरा घडली. ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
रमेश साक:या गावीत (40) रा.पानबारा, ता.नवापूर असे मयताचे नाव आहे. सुरत-धुळे महामार्गाची स्थिती खराब असतांनाही ट्रक चालक गजानन अंबादास करवाल (27) रा.धोत्र, जि.वर्धा याने भरधाव ट्रक चालविला. ट्रकवरील ताबा सुटल्याने त्याने समोरून येणा:या दुचाकीला धडक दिली. अपघातात रमेश गावीत यांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत जमसू सक:या गावीत यांनी फिर्याद दिल्याने गजानन करवाल यांच्याविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार येलवे करीत आहे. 
 

Web Title: Two killed in truck collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.