बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 12:15 IST2019-12-21T12:14:26+5:302019-12-21T12:15:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापुर तालुक्यातील विसरवाडी ते नंदुरबार रस्त्यावर बोदवड गावाजवळ बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत युवक ठार ...

बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : नवापुर तालुक्यातील विसरवाडी ते नंदुरबार रस्त्यावर बोदवड गावाजवळ बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत युवक ठार तर एक जण जखमी झाला आहे़ शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली़
अंकुल उदेसिंग वसावा (२१) रा़ नवावडगाव ता़ उच्छल जि़ तापी असे मयत युवकाचे नाव आहे़ शुक्रवारी सायंकाळी अंकुल हा पंकज लक्ष्मण वसावा याच्यासोबत जीजे १६ सी २१४० या दुचाकीने गावाकडे जात असताना बोदवड गावाच्या वळण रस्त्यावर विसरवाडीकडून येणाऱ्या जीजे १८ झेड ५६७७ सुरत-बºहाणपूर या बसने त्याला धडक दिली़ यात अंकुल हा जागीच ठार झाला तर पंकज हा गंभीर जखमी झाला़
याबाबत जयेश वसावा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विसरवाडी पोलीस ठाण्यात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ बसचालक हा ओव्हरटेकच्या प्रयत्नात झाल्याने हा अपघात घडल्याची माहिती देण्यात आली आहे़