नवापुरात जीप अपघातात दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 13:02 IST2020-03-07T13:01:59+5:302020-03-07T13:02:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरातील नागपूर-सुरत महामार्गावरील देवलफळी भागात जीपगाडी उलटून अपघात झाला. या अपघातात दोन जण जखमी ...

Two injured in jeep accident in Navapur | नवापुरात जीप अपघातात दोन जखमी

नवापुरात जीप अपघातात दोन जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : शहरातील नागपूर-सुरत महामार्गावरील देवलफळी भागात जीपगाडी उलटून अपघात झाला. या अपघातात दोन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गुजरात राज्यातील शिंगणा येथील जीपगाडी नवापूरला येत असताना इस्लामपूर भागातील एक लहान बालक महामार्गावर आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात जीप रस्त्याच्या कडेला नाल्यात उलटून अपघात झाला. या अपघातात रामजी गामीत व भानू गामीत (दोन्ही रा.शिंगाणा, जि.डांग) हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नवापूर शहरातील इस्लामपुरा भागातील मुलांच्या शासकीय वसतिगृहासमोर हा अपघात झाल्याने आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन दोन्ही जखमींना जीपमधून बाहेर काढून सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याठिकाणी नाला असून नाल्याला कठडे नसल्याने हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. तासाभरात क्रेनच्या सहाय्याने जीपला नाल्यातून काढण्यात आले. यादरम्यान महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

Web Title: Two injured in jeep accident in Navapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.