कोंडाईबारी घाटात अपघातात दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 12:45 IST2021-02-08T12:45:50+5:302021-02-08T12:45:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : कोंडाईबारी घाटात ट्रक व ट्राला यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाले तर ...

कोंडाईबारी घाटात अपघातात दोन जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : कोंडाईबारी घाटात ट्रक व ट्राला यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाले तर दोन्ही बाजूला वाहतूक अर्धा तास पर्यंत खोळंबली होती. हा अपघात रविवारी सायंकाळी घडला.
घाटात सुरत कडून धुळ्याकडे धावणारा ट्राला (क्रमांक सी.जी.१७ जी ए 30४६) हा जात असताना त्याच वेळी धुळे कडून सुरत कडे ट्रक (क्रमांक एन एल ०१ क्यु ३४४२) हा भरधाव वेगाने धावत असताना दोघा वाहनांमध्ये अपघात झाला. हा अपघात वळण रस्त्यावर झाल्याने दोन्ही वाहने दुभाजकावर आदळली. दोन्ही वाहनांचे चालक जखमी झाले आहेत. अर्धातास वाहतूक खोळंबली होती. विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप पाटील, महामार्गचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर एम काझी व कर्मचारी दाखल झाले.