आवगे गावानजीक अपघातात दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 12:46 IST2020-01-01T12:46:40+5:302020-01-01T12:46:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील आवगे-जुनवणे गावानजीक मंगळवारी मोटारसायकल व डंपर यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक ...

Two injured in accident | आवगे गावानजीक अपघातात दोन जखमी

आवगे गावानजीक अपघातात दोन जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील आवगे-जुनवणे गावानजीक मंगळवारी मोटारसायकल व डंपर यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी तर एक किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली.
तालुक्यातील आवगे-जुनवणे गावाजवळ तोरणमाळ रस्त्यावर मोटार सायकल (क्रमांक एम.एच. ३९ - ५१६३) व डंपर (क्रमांक एम.एच. ३९ सी-०३६७) यांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलस्वार दीपक पावरा (२८, रा.उमराणी) हे गंभीर जखमी तर किरसिंग शिवाजी पावरा (३०) हे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना म्हसावद रुग्णालयात दाखल केले आहे.

Web Title: Two injured in accident