टपरी लावण्याच्या वादातून दोन गटात जबर मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 12:31 IST2020-09-14T12:31:31+5:302020-09-14T12:31:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : अक्कलकुवा शहरात घडलेल्या गुन्ह्यांमध्ये परस्परविरोधी अॅट्रॉसिटी व दरोड्याचा गुन्हा दाखल होऊन अक्कलकुवा ग्रामपंचायतीचे माजी ...

टपरी लावण्याच्या वादातून दोन गटात जबर मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : अक्कलकुवा शहरात घडलेल्या गुन्ह्यांमध्ये परस्परविरोधी अॅट्रॉसिटी व दरोड्याचा गुन्हा दाखल होऊन अक्कलकुवा ग्रामपंचायतीचे माजी सरपंचसह दहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे .
पोलिस सूत्रांनुसार, अक्कलकुवा शहरामध्ये अविनाश भरत वळवी रा. सोरापाडा याने चायनीजची टपरी लावली होती. ती टपरी माजी सरपंच प्रेमचंद जैन, मुलगा कल्पेश जैन यांच्यासह त्यांच्या दोन मुलांनी सदर टपरी उलटवून दिली. ही टपरी पुन्हा उभी करून देण्यासाठीची मागणी केली असता यातील आरोपी यांनी जातीवाचक शिवीगाळ करीत धाऱ्या, लोखंडी पाइप तसेच फायबरच्या काठ्यांनी अविनाश भरतसिंग वळवी, नेहरू वळवी, हर्षल वळवी, राहुल वसावे, निलेश पाडवी, हेमंत पाडवी, मयुर पाडवी यांना जबर मारहाण केली. याबाबत अविनाश वळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजी सरपंच प्रेमचंद जैन त्यांच्या मुलगा कल्पेश जैन यासह लहान व मोठा मुलगा यांच्यावर मारहाणीसह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संशयीतांना अटक करण्यात आली आहे. दुसरी फिर्याद प्रेमचंद जैन यांनी दिली त्यात म्हटले आहे की, ११ सप्टेंबर रोजी आरोपी अविनाश भरतसिंग वळवी राहणार सोरापाडा नेहरू वळवी, हर्षल वळवी, राहुल वसावे, निलेश पाडवी, हेमंत पाडवी ,मयुर पाडवी यांच्यासह दोन जण यांना घरासमोरील टपरी काढून घेण्यास सांगितले असता तहसील कार्यालय आवार तसेच दुकानातील गल्ल्यातून १५ हजार रुपये रोख तसेच ८५ हजार रुपये किमतीची तीन तोळ्याची सोन्याची चैन काढून घेत, लाकडी दांडके व लोखंडी पाइप ने मारहाण केली. याबाबत प्रेमचंद जैन यांनी दिलेल्या फियार्दीवरून तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम करीत असून दुसºया गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे करीत आहेत.