महिलेचा विनयभंग केल्याच्या वादातून दोन गटात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 11:23 IST2019-04-25T11:22:53+5:302019-04-25T11:23:18+5:30
शहाद्यातील घटना : परस्परविरोधी फिर्यादीवरुन गुन्हा

महिलेचा विनयभंग केल्याच्या वादातून दोन गटात हाणामारी
नंदुरबार : महिलेचा विनयभंग केल्याच्या वादातून शहादा शहरातील कुकडेल भागात दोन गटात हाणामारी झाली़ यात दोघे जखमी झाले आहेत़ मंगळवारी सकाळी ११़३० वाजता ही घटना घडली होती़
शहाद्यातील कुकडेल भागात राहणारी महिला शेतात शौचासाठी गेली होती़ यावेळी तौफिक अमीर मन्सुरी रा़ बाजीपीर चौक, कुकडेल शहादा हा बघत असल्याचे महिलेला दिसून आले़ तिने त्यास जाब विचारला होता़ यातून सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास श्रमीकनगर भागात शरद कोळी यांच्या घरासमोर तौफिक याच्यासह फैजान अमीर अन्सारी, अन्वर अमीर अन्सारी, फरहाज अमीर अन्सारी या तिघांनीही महिला व तिचा मुलगा यांना मारहाण केली़ यादरम्यान तौफिक अन्सारी याने महिलेचा विनयभंग केला़ तसेच इतरांनी मारहाण करुन शिवीगाळ करत जिवेठार मारण्याची धमकी दिली़ याबाबत महिलेच्या फिर्यादीवरुन चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़
दरम्यान तौफिक अन्सारी याने दिलेल्या फिर्यादीनुसार महिला शौचासाठी गेली असताना तिला पाहिले हा गैरसमज करुन घेत दिपक कोळी, गोविंदा ठाकरे, अजय कोळी, विजय कोळी सर्व रा़ बाजीपीर चौक यांनी लाठ्याकाठ्या व कुºहाडीने मारहाण केली तसेच शिवीगाळ करुन जीवेठार मारण्याची धमकी दिली़ यावरुन दिपक कोळी, गोविंदा ठाकरे, विजय कोळी व अजय कोळी यांच्याविरोधात शहादा पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल आहे़ दरम्यान मारहाणीत तौफिक अन्सारी, फैजान अन्सारी यांच्यासह एकजण जखमी झाला आहे़ तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील व पोलीस नाईक तमखाने करत आहेत़ उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांनी याठिकाणी भेट देत परिस्थिती आटोक्यात आणली़