चौपाळे येथे दोन गटात तुंबळ हाणामारी

By Admin | Updated: June 24, 2017 12:47 IST2017-06-24T12:47:23+5:302017-06-24T12:47:23+5:30

चौपाळे येथे दोन गटात किरकोळ वादातून तुंबळ हाणामारी झाली़ या प्रकरणी परस्परांविरूद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Two groups in Chopale have a trumpet clash | चौपाळे येथे दोन गटात तुंबळ हाणामारी

चौपाळे येथे दोन गटात तुंबळ हाणामारी

 ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.24 - तालुक्यातील चौपाळे येथे दोन गटात किरकोळ वादातून तुंबळ हाणामारी झाली़ या प्रकरणी परस्परांविरूद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौपाळे येथील भाईदास शंकर भिल व सुशिलाबाई जयसिंग भिल यांच्या कुटूंबियांमध्ये वाद झाला होता़ या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाल़े यात भाईदास भिल हे जखमी झाल़े त्यांच्या फिर्यादीवरून रंज्या जामसिंग भिल, काश्या ऐकू भिल, संतोष जयसिंग भिल, छगन मगन भिल, न्हानू ऐकू भिल, बसू भिकू भिल, बपू सुका भिल, अक्काबाई देवा भिल, गमताबाई सबपा भिल, निलूबाई कडू भिल, छगनाबाई सुकू भिल सर्व रा़ चौपाळे यांच्या विरोधात तर दुस:या गटाकडून सुशिलाबाई भिल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार देवीदास शंकर भिल, शंकर मंगा भिल, भाईदास शंकर भिल, शिवदास शंकर भिल, रामभो दासू भिल, रामा मंगा भिल, शिवदास सोमा भिल, मच्छिंद्र जंगू भिल, गणेश रामा भिल, रोहिदास सोमा भिल सर्व रा़ चौपाळे यांच्याविरोधात नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 
हाणामारीत भाईदास शंकर भिल यांना विटांचा मार लागल्याने ते जखमी झाले आह़े तर दुस:या गटातील जयसिंग भिल व अनिताबाई भिल यांना मार लागल्याने ते दोघेही गंभीर जखमी झाले आहेत़ 

Web Title: Two groups in Chopale have a trumpet clash