विवाहितेला पळवून नेल्याच्या संशयावरून दोन गटात मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 12:51 IST2018-10-07T12:51:53+5:302018-10-07T12:51:57+5:30
उजळोद येथील घटना : आठ जण जखमी, 32 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

विवाहितेला पळवून नेल्याच्या संशयावरून दोन गटात मारहाण
मंदाणे : शहादा तालुक्यातील उजळोद गावातील विवाहितेला दोघा मुलांसह पळवून नेल्याप्रकरणी विचारपूस करण्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी होऊन आठ जण जखमी झाल्याची घटना घडली. दोन्ही गटातर्फे याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून 32 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावात तणावपूर्ण शांतता आहे.
पोलीस सूत्रानुसार, शहादा तालुक्यातील उजळोद गावातील हिरालाल बाजीराव पाटील याने गावातीलच विवाहितेला दोन मुलांसह पळवून नेल्याच्या संशयावरून त्यास याबाबत विवाहिता व मुले कुठे आहेत अशी विचारणा प्रकाश वसंत पाटील यांनी केली. याचा राग येऊन आरोपी हिरालाल बाजीराव पाटील, गोकूळ वामन पाटील, हिरामण वामन पाटील, राकेश सज्रेराव पाटील, हिंमत मधुकर पाटील, सज्रेराव बाबूराव पाटील, शिवदास पाटील, अमोल पाटील, योगेश पाटील, मीना राकेश पाटील, सुनीता हिंमत पाटील, नर्मदा वामन पाटील, मीना बाजीराव पाटील, विमलबाई गोकूळ पाटील (सर्व रा.उजळोद) यांनी फिर्यादी प्रकाश पाटील व त्यांच्या गटातील लोकांना हिरालाल पाटील यांनी आपल्या घरातून सर्वानी लाकडी काठय़ा, दांडक्यांनी मारहाण करून दुखापत केली. ही घटना 5 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात प्रकाश पाटील यांनी फिर्याद दिल्याने 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत तीन जण जखमी झाले. या गुन्ह्याचा तपास फौजदार ज्ञानेश्वर बडगुजर करीत आहेत. याच घटनेत मीना राकेश बोरसे यांनीही शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीत आरोपी वसंत भीमराव पाटील याने माझा चुलत दीर हिरालाल पाटील यास तू माङया मुलीला का भेटतो, प्रेमसंबंध का ठेवतो यावरून वसंत भीमराव पाटील, कैलास भीमराव पाटील, तुकाराम भीमराव पाटील, सोनू वसंत पाटील, संतोष विश्वास पाटील, नितीन विश्वास पाटील, सोन्या तुकाराम पाटील, बबलू रवींद्र पाटील, लोटन दिलीप पाटील, दिलीप युवराज पाटील, किशोर विश्वास पाटील, बापू भावराव पाटील, रवींद्र युवराज पाटील, गोपाल संभाजी पाटील, बापू देवीदास पाटील, छोटू भीमराव पाटील, राहुल छोटू पाटील, आकाश छोटू पाटील यांनी एकत्र गर्दी करून लोखंडी सळई, गज, लाठय़ा-काठय़ांनी मारहाण करून पाच जणांना जखमी केले. याप्रकरणी वरील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक बापू शिंदे हे करीत आहे. या हाणामारीच्या घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता आहे.