नाचताना धक्का लागल्याच्या वादातून नवापूरात दोन गटात मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 12:52 IST2018-02-21T12:51:36+5:302018-02-21T12:52:19+5:30

Two groups assaulted in controversy | नाचताना धक्का लागल्याच्या वादातून नवापूरात दोन गटात मारहाण

नाचताना धक्का लागल्याच्या वादातून नवापूरात दोन गटात मारहाण


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लगआत नाचण्याचा धक्का लागल्याचा कारणावरून नवापुरात दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून पोलिसांनीही जमावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नवापुरातील मच्छिबाजार परिसरात लगआत नाचण्याच्या वादातून सागर वसंत मावची व संजय उर्फ भिकू मावची यांच्यात वाद झाला. वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले.
लाकडी डेंगारा आणि नानचाकूचा मारहाणीत वापर करण्यात आला.
याबाबत सागर वसंत मावची यांनी फिर्याद दिल्याने संजय उर्फ भिकू मावची, समीर मधुकर मावची, सागर परमेश मावची, टिकेश किसन मावची, अमिर मधू मावची, याकुब वेच्या मावची, अतुल परेश गावीत, कमलेश धेडग्या मावची, अविनाश रामसिंग मावची, आकाश कालू मावची यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी फिर्याद कमलेश धेडग्या मावची यांनी दिली. त्यावरून मनिष वसंत मावची, अजय फकिरा मावची, चेतन संजू मावची, संदीप वसंत मावची, उखडय़ा वेच्या मावची, सागर वसंत मावची व विकास दिलीप मावची यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात पोलिसांनीही फिर्याद दिली आहे. जमादार कृष्णा पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 18 जणांविरुद्ध मनाई आदेशाचे उल्लंघन करणे व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत व सहायक निरिक्षक डी.डी.पाटील करीत आहे.

Web Title: Two groups assaulted in controversy