जयनगर येथे विद्युत तार तुटल्याने दोन शेळ्या आणि एका बोकडाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:36 IST2021-08-18T04:36:49+5:302021-08-18T04:36:49+5:30
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जयनगर येथील रवींद्र भिकागिर गोसावी आणि सचिन नगराळे यांनी कर्ज काढून २२ शेळ्या आणि ...

जयनगर येथे विद्युत तार तुटल्याने दोन शेळ्या आणि एका बोकडाचा मृत्यू
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जयनगर येथील रवींद्र भिकागिर गोसावी आणि सचिन नगराळे यांनी कर्ज काढून २२ शेळ्या आणि २ बोकड घेतले आहेत. नेहमीप्रमाणे जंगलात चरण्यासाठी गेलेल्या शेळ्या दुपारी सव्वातीन वाजता पाऊस चालू झाल्यामुळे घरी परतत होत्या. मात्र, या शेळ्या आपल्या नेहमीच्या जागेवर गोठ्यात पोहोचण्याआधीच गल्लीतील विजेचा खांबावरील जीर्ण झालेला महावितरण कंपनीचा विद्युत तार पाऊस चालू असताना, बकऱ्यांच्या कळपामधील दोन शेळ्या आणि एका बोकडवर पडल्याने ते विजेच्या धक्क्याने मृत्यू पावले. सुदैवाने कळपातील बाकी शेळ्या व बोकड वाचले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे सदर मालकांचे अंदाजे पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाले असून, महावितरण कंपनीकडून मृत झालेल्या शेळ्या व बोकडचे नुकसान भरपाई मिळण्याची मागणी मालक रवींद्र गोसावी व सचिन नगराळे यांनी केली आहे.