गव्हाळी फाटय़ाजवळ अपघातात दोनजण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 16:57 IST2019-03-02T16:57:08+5:302019-03-02T16:57:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : तालुक्यातील गव्हाळी फाटय़ाजवळ ब:हाणपूर-अंकलेश्वर राज्यमार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन युवक ठार तर ...

गव्हाळी फाटय़ाजवळ अपघातात दोनजण ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : तालुक्यातील गव्हाळी फाटय़ाजवळ ब:हाणपूर-अंकलेश्वर राज्यमार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन युवक ठार तर युवती जखमी झाली़ शुक्रवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला़
आकाश प्रतापसिंग नाईक (20) रा़ जुना कावठा ता़ निझर जि़तापी व जिगAेश प्रभू वसावा (18) रा़ सोनगड जि़तापी अशी मयतांची नावे आहेत़ तर संगीता खोजल्या वसावा रा़ उमरपाडा जि़ सुरत असे जखमी युवतीचे नाव आह़े शुक्रवारी दुपारी तिघेही जीजे 26 क्यू 9178 या दुचाकीने गुजरात राज्यात जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला़ तिघांना गंभीर दुखापती झाल्या़ रस्त्यावरुन ये-जा करणा:या वाहनधारकांनी तिघांना खापर येथे दाखल केले असता दोघांना मृत तर युवतीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल़े
याबाबत उशिरार्पयत अक्कलकुवा पोलीस ठाण्यात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होत़े
या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणावर वाहतूक सुरू असते. शिवाय रस्त्याची अवस्था देखील खराब झाली आहे. त्यामुळे अपघात होत असून उपाययोजनेची मागणी होत आहे.