निर्मल फाउंडेशनतर्फे दोनदिवसीय ऑनलाइन चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:19 IST2021-06-30T04:19:58+5:302021-06-30T04:19:58+5:30

या दोनदिवसीय वेबिनारच्या दुसर्‍या दिवसाच्या प्रथम सत्रात मुंबई येथील वैद्य गौरी बोरकर यांनी ‘महिलांचे आरोग्य आणि आयुर्वेद’ याविषयी मार्गदर्शन ...

Two-day online seminar by Nirmal Foundation | निर्मल फाउंडेशनतर्फे दोनदिवसीय ऑनलाइन चर्चासत्र

निर्मल फाउंडेशनतर्फे दोनदिवसीय ऑनलाइन चर्चासत्र

या दोनदिवसीय वेबिनारच्या दुसर्‍या दिवसाच्या प्रथम सत्रात मुंबई येथील वैद्य गौरी बोरकर यांनी ‘महिलांचे आरोग्य आणि आयुर्वेद’ याविषयी मार्गदर्शन केले. समारोपप्रसंगी सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ.मृणालिनी फडणवीस यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या आर्थिक व मानसिकरीत्या सक्षम होण्यासाठी त्यांच्यातल्या अंगभूत कौशल्यांचा विकास होणे गरजेचे आहे. पुरुषांच्या तुलनेने महिलांचा जन्मदर ही भारतातील मोजकी राज्ये सोडली तर चिंतेची बाब आहे. हा सामाजिक असमतोल शिक्षणानेच दूर होऊ शकतो, असे सांगितले. तसेच गेल्या सहा महिन्यांपासून नि:शुल्क ऑनलाइन योगवर्ग व वेटलॉस ग्रुपमधील ३००पेक्षा जास्त साधकांमधून काही साधकांनी मनोगत व्यक्त केली. यात सुशीला पाटील (ऐनपूर), सीमा पाटील (मुंबई), रोहिणी पाटील (चोपडा), प्रिया देशमुख (चाळीसगाव), योगीता पाटील (ऐनपूर) आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन सुनीता पाटील (चोपडा) यांनी, तर प्रमुख अतिथींचा परिचय प्राचार्या डॉ. प्रमिला भोसले (कोल्हापूर) व पौर्णिमा पाटील (औरंगाबाद) यांनी करून दिला. आभार निर्मल फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा. नामदेव पाटील, प्राचार्य डॉ. एच.एम. पाटील, निरूपम पाटील यांनी सहकार्य केले.

Web Title: Two-day online seminar by Nirmal Foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.