शहादा व धडगाव येथे विनयभंगाच्या दोन घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 12:37 IST2018-07-06T12:37:02+5:302018-07-06T12:37:07+5:30

शहादा व धडगाव येथे विनयभंगाच्या दोन घटना
नंदुरबार : जिल्ह्यात विनयभंगाच्या दोन घटना घडल्या़ शहादा आणि धडगाव येथे झालेल्या या दोन्ही घटनांबाबत त्या-त्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
शहादा
शहरातील गरीब नवाज कॉलनीत राहणा:या 26 वर्षीय विवाहित महिलेचा एकाने विनयभंग करून त्याच्या कुटूंबियाने महिलेच्या पतीला शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली़ हा प्रकार फेब्रुवारी ते मार्च या दरम्यान गरीब नवाज कॉलनीतील महिलेच्या घरी घडला़ संशयित तौफिक मेमन याने महिलेसोबत अलि कृत्य केले होत़े महिलेने मंगळवारी रात्री उशिरा शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तौफिक मेमन, जमिलाबी मेमन, तालिक मेमन, तरलीक मेमन, अकरेज मेमन यांच्याविरोधात गुन्हा दाखल आह़े तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक नेरकर करत आहेत़
धडगाव
कुकलटचा छापरीपाडा ता़ धडगाव येथील 35 वर्षीय महिला मंगळवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घरात असताना रोहिदास चतुर पावरा व हारसिंग वाह:या पावरा दोन्ही रा़ कुकलट यांनी तिला आवाज देत बाहेर बोलावून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला़ महिलेने आरडाओरड केल्याने दोघे पळून गेल़े कुकलट हे अती दुर्गम भागातील गाव असल्याने पिडित महिलेस तेथून येण्यास 1 दिवस लागल्याने गुरूवारी रात्री धडगाव पोलीस ठाण्यात दोघांविरोधात महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आह़े