खापर घटनेप्रकरणी दोन गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 13:16 IST2019-01-07T13:15:36+5:302019-01-07T13:16:12+5:30

नंदुरबार : खापर येथे झालेल्या मारहाणप्रकरणी दरोडय़ासह दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. संशयीतांची धरपकड सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी ...

Two cases have been filed in connection with the incident | खापर घटनेप्रकरणी दोन गुन्हे दाखल

खापर घटनेप्रकरणी दोन गुन्हे दाखल

नंदुरबार : खापर येथे झालेल्या मारहाणप्रकरणी दरोडय़ासह दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. संशयीतांची धरपकड सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
खापर येथे दोन दिवसांपूर्वी मारहाणीची घटना घडली होती. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने अनर्थ टळला होता. याबाबत बाशिदअली ईसाकअली बलोच रा.कोराई यांनी फिर्याद दिली आहे. संदेश तडवी व इतर आपल्या घरासमोर मोबाईलद्वारे व्हिडीओ शुटींग करतात. त्याबाबत सांगण्यास गेलो असता जमावाने चाकू, टॉमी, लाठय़ा काठय़ांनी मारहाण केली तसेच साडेसात हजार रुपये रोख व अध्र्या तोळ्याची सोन्याची अंगठी जमावाने जबरीने काढून घेतल्याचे बलोच यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.  
त्यांच्या फिर्यादीवरून संदेश तडवी, रवी तडवी, सोहम पाडवी,   सोनू पाडवी, यश पाडवी, राकेश अहिरे, गोपाळ तडवी, कलावती  तडवी, रायसिंग तडवी, विजय तडवी, राजू तडवी व इतर 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. तपास फौजदार एम.जे.पवार करीत आहे.
पोलिसांकडूनही फिर्याद
पोलिसांकडूनही जमावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार मोहन शिरसाठ यांनी फिर्याद दिली. 
गैर कायद्याचा जमाव जमवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला व मनाई आदेशाचे उल्लंघन केले. त्यावरून कलावती तडवी, रायसिंग तडवी, विजय तडवी, राजू तडवी व इतर 20 ते 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक भंडारे करीत आहे.

Web Title: Two cases have been filed in connection with the incident