टेम्पोच्या धडकेत दोन्ही भाऊ ठार, शहादानजीकची घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 12:42 IST2020-01-25T12:42:26+5:302020-01-25T12:42:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोनजण ठार झाल्याची घटना अलखेड-तिखोरा, ता.शहादा रस्त्यावर ...

Two brothers killed in Tempo clash, martyrdom incident | टेम्पोच्या धडकेत दोन्ही भाऊ ठार, शहादानजीकची घटना

टेम्पोच्या धडकेत दोन्ही भाऊ ठार, शहादानजीकची घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोनजण ठार झाल्याची घटना अलखेड-तिखोरा, ता.शहादा रस्त्यावर २२ रोजी घडली. दोघांना अत्यवस्थ स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेतांना दोघांचा मृत्यू झाला.
भाईदास रेहन्या पावरा (२४) व लक्ष्मण रेहन्या पावरा (२२) रा. साबलापाणी, ता.शहादा असे मयतांची नावे आहेत. दोघेजण त्यांच्या दुचाकीने अलखेड-तिखोरा रस्त्याने जात असतांना समोरून आलेल्या भरधाव टेम्पोने त्यांना जबर धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेतांना दोघांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर वाहनचालक तेथून पसार झाला होता. याबाबत रेहन्या पावरा याच्या फिर्यादीवरून टेम्पो चालकाविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार पाडवी करीत आहे.

Web Title: Two brothers killed in Tempo clash, martyrdom incident