आतापर्यंत घेतले अडीच हजार स्वॅब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 21:54 IST2020-07-14T21:54:04+5:302020-07-14T21:54:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ यासोबत स्वॅब नमुन्यांच्या संकलनातही वाढ झाली असून आतापर्यंत ...

आतापर्यंत घेतले अडीच हजार स्वॅब
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ यासोबत स्वॅब नमुन्यांच्या संकलनातही वाढ झाली असून आतापर्यंत रुग्णालयाने अडीच हजार जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवून त्याचे अहवाल मिळवले आहेत़
जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे़ तेव्हापासून आतापर्यंत २६९ जणांना संसर्ग तर १६८ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर तसेच कोरोनाबाधित असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर नागरिकांनी दिलेल्या स्वॅबची तपासणी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयातून करवून घेतली होती़
आरोग्य प्रशासनाने आतापर्यंत एकूण २ हजार ४४५ स्वॅब संकलित केले आहेत़ यातील २६९ पॉझिटिव्ह तर २ हजार ४६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत़ निगेटिव्ह अहवालांची संख्याही दोन हजाराच्या पुढे गेली आहे़ आजअखेरीस जिल्ह्यात अॅक्टीव्ह पेशंटची संख्या ही ८० आहे़ कोविड कक्षातून ३ रुग्ण यापूर्वी पुणे, २ नाशिक, १ वडोदरा तर दोघांना सुरत येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे़
दरम्यान नाशिक येथून चार रुग्ण जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत़ यात सर्वाधिक रुग्ण हे नंदुरबार तालुक्यातील असून त्याखालोखाल शहादा येथील रुग्ण उपचार घेत आहेत़
दरम्यान सोमवारी ३० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत़ प्रशासनाने १८ जणांचे स्वॅब कलेक्ट करण्यात आले होते़ यातून ११६ स्वॅब रिपोर्टची प्रतिक्षा आहे़ नव्याने आढळून आलेल्या रुग्णांसह रविवारी दाखल रुग्णांच्या संपर्कात आलेल्या एकूण ६० पेक्षा अधिक जणांना इन्स्टीट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे़ तर काहींना दक्षता म्हणून होम क्वारंटाईन करण्यात आले आहे़ नंदुरबार शहरातील क्वारंटाईन कक्षात ५० च्या जवळपास संपर्कात आलेल्या नागरिकांना ठेवले गेले आहे़