अडीच लाखाचे लाकूड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 12:26 IST2020-11-10T12:26:12+5:302020-11-10T12:26:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : तालुक्यातील हळदाणी गावात वन विभागाने छापा टाकत अडीच तीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला ...

अडीच लाखाचे लाकूड जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : तालुक्यातील हळदाणी गावात वन विभागाने छापा टाकत अडीच तीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे नवापूर व चिंचपाडा वनविभागाचा दुपारी पाच वाजेच्या सुमारास संयुक्त कारवाई केली.
यात ५४इमारती लाकूड व आठ नग सागवानी लाकूड,दोन डिझाईन मशीन ,दोन पायउतार मशीन,एक रंदा मशीन, एक कटर मशीन, तीन इलेक्ट्रॉनिक मोटर, एक मोठी करवत असा अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही चिंचपाडा वनक्षेत्रपाल आर बी पवार व नवापुर वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे यांच्या पथकाने कारवाई केली.
वनविभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास नवापूर तालुक्यातील हळदाळी गावात एका उसाच्या शेतामध्ये इमारती लाकूड व मशनरी लपवून ठेवलेली होती. याची गुप्त माहिती वन विभागाला कळाल्यानंतर तात्काळ घटनास्थळी चिंचपाडा व नवापूर वनविभागाच्या पथकाने जाऊन कारवाई केली. आहे. येथील वन तस्कराने सदर माल नदी-नाले शेतात इकडेतिकडे अस्ताव्यस्त फेकून दिला होता. त्याचा शोध घेत वन विभागाने अडीच तीन लाखाचा मुद्देमाल जप्त करून नवापुर वन आगारात पंचनामा करून जप्त केला आहे या कारवाईने वन तस्करांचे धाबे दणाणले आहे.
गेल्या सहा महिन्यात वन विभागाने तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कारवाई केली असून लाखो रुपयांचे लाकूड जप्त केले आहे.