नवापुर तालुक्यातील नवापाडा येथून अडीच लाखाचे सागवानी लाकूड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 13:25 IST2020-04-09T13:24:52+5:302020-04-09T13:25:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : तालुक्यातील नवापाडा येथून वनविभागाने अडीच लाख रुपयांचे अवैध सागवानी लाकूड आणि सुतारकामाचे साहित्य ताब्यात ...

Two and a half lakh sagawani wood was seized from Navapada in Navapur taluka | नवापुर तालुक्यातील नवापाडा येथून अडीच लाखाचे सागवानी लाकूड जप्त

नवापुर तालुक्यातील नवापाडा येथून अडीच लाखाचे सागवानी लाकूड जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापुर : तालुक्यातील नवापाडा येथून वनविभागाने अडीच लाख रुपयांचे अवैध सागवानी लाकूड आणि सुतारकामाचे साहित्य ताब्यात घेतले़ मंगळवारी वनविभागाच्या पथकाने नवापाडा गावातील एका घरात धाड टाकून ही कारवाई केली़ गेल्या दोन महिन्यातील ही सहावी कारवाई आहे़
नंदुरबार वनविभागाचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांना नवापाडा गावातील एका घरात अवैध सागवानी लाकूड आणि फर्निचर बनवण्याचे काम सुरु असल्याची माहिती मिळाली होती़ त्यांनी पथकासह याठिकाणी धाड टाकली असता, सागवान आणि शिसम लाकडासह सुतारकामाचे साहित्य मिळून आले़ यावेळी वनक्षेत्रपाल आऱबी़पवार यांच्यासह नंदुरबार आणि नवापुर रेंजचे वनपाल पी़बी़ मावची, आऱबी़जगताप, एम़जे़मडलीक, पी़एस़पाटील, उपस्थित होते़ वनविभागाने घेतलेल्या झडतीदरम्यान याठिकाणी ताजा तोडीचे साग, सिसम, पायउतराई, तयार सोफा, सिसमच्या सेट, रंधा मशिन, सुतार साहित्य असा दोन लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला़ जप्त करण्यात आलेले लाकूड भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम ५२ अन्वये नवापुर येथील शासकीय विक्री आगारात जमा करण्यात आले़ याप्रकरणी कामोद ता़ नवापुर येथील वनपालांनी नवापाडा येथील संशयिताविरोधात वनगु्न्हा दाखल केला आहे़
नवापूर तालुक्यात गेल्या काही महिन्यात शेतकऱ्यांनी शेतात लावलेले साग आणि शिसमचे झाड तोडून त्याच्या लाकडांची तस्करी सुरु झाली आहे़ दिवसेंदिवस वाढणाºया या प्रकारांवर आळा घालण्यासाठी वनविभागाकडून सातत्याने कारवाई सुरु आहे़ गेल्या दोन महिन्यात सहा कारवाया करुन लाखो रुपयांचा लाकूड साठा जप्त करण्यात आला आहे़ वनविभागाचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांच्या मार्गदर्शनात पथकाने नवापाडा येथे कारवाई केली़
दरम्यान तस्करांच्या कारवायांवर आळा घालण्यासाठी वनविभाग स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ यांच्या संपर्कात असून त्यांनी लाकूडतोड करणाऱ्यांची माहिती देण्याचे सांगण्यात आले आहे़यासाठी तालुक्यातील विविध भागात वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी वेळोवेळी भेटी देत आहेत़
नवापूर, चिंचपाडा, नंदुरबार वनक्षेत्रात साग, शिसम आणि खैरची तोड थांबवून त्याची तस्करी रोखण्यासाठी विविध उपाययोजनांवर भर देत असल्याची माहिती सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी दिली आहे़

Web Title: Two and a half lakh sagawani wood was seized from Navapada in Navapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.