लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील संजय नगरात दोन ठिकाणी वीज चोरीचे गुन्हे कंपनीच्या पथकांनी उघडकीस आणले आहे़ या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे़संजय नगरातील प्रकाश धुडकू आखाडे व सुदाम ओंकार बागले या दोघांच्या घरात होणाऱ्या विज पुरवठ्यासाठी त्यांनी घरासमोरील पोलवर आकडे टाकून वीज चोरी केली होती़ यातून दोघांनी १ हजार ५७७ युनिट वीज चोरी करुन ३८ हजार ९७७ रुपयांचे नुकसान केले़ दरम्यान याच भागातील अनिल दिवाकर कुंकारी व शंकुतला कंडारे यांच्या घरातही आकडे टाकून वीज पुरवठा करण्यात येत असल्याचे वीज कंपनीच्या पथकाला दिसून आले होते़ दोघांकडून २ हजार ७६ युनिट विजेची चोरी करण्यात आली आहे़ यातून २४ हजार ८०१ रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती कंपनी प्रशासनाने दिली आहे़याबाबत कंपनीचे कर्मचारी गोपाल रमेश वराडे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन प्रकाश आखाडे, सुदाम बागले, अनिल कुंकारी, शंकुतला कंडारे यांच्याविरोधात वीज चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ कंपनीकडून कारवाई सुरु आहे़
नंदुरबारात वीज चोरी प्रकरणी दोघांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 12:35 IST