नंदुरबार जिल्ह्यातील वीस हजार विद्याथ्र्याना सवलतीच्या दरात पासेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 21:00 IST2018-11-10T21:00:10+5:302018-11-10T21:00:15+5:30

नंदुरबार : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त  तळोदा, शहादा, नंदुरबार व नवापूर तालुक्यातील 19 हजार 987 विद्याथ्र्याना सवलतीच्या दरात मोफत  पासेस् उपलब्ध ...

Twenty thousand students of Nandurbar district pass on a discount | नंदुरबार जिल्ह्यातील वीस हजार विद्याथ्र्याना सवलतीच्या दरात पासेस

नंदुरबार जिल्ह्यातील वीस हजार विद्याथ्र्याना सवलतीच्या दरात पासेस

नंदुरबार : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त  तळोदा, शहादा, नंदुरबार व नवापूर तालुक्यातील 19 हजार 987 विद्याथ्र्याना सवलतीच्या दरात मोफत  पासेस् उपलब्ध होणार आहेत़ 15 नोव्हेंबर ते 15 एप्रिल दरम्यान म्हणजे 2018-2019 या उर्वरीत शैक्षणिक वर्षासाठी हा लाभ होणार आह़े 
राज्यातील 180 दुष्काळी तालुक्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून विद्याथ्र्याना उर्वरीत शैक्षणिक वर्ष पुर्ण करण्यासाठी मोफत एसटी पासेस् देण्यात येणार आहेत़ या पूर्वी राज्य परिवहन महामंडळाकडून शैक्षणिक, तांत्रिक तसेच व्यावसायिक शिक्षण घेणा:या उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्याथ्र्याना शिक्षणासाठी मासिक पासमध्ये 66.67 टक्के सवलत दिली जाते व विद्याथ्र्याकडून 33.33 टक्के रक्कम वसूल करण्यात येत असत़े परंतु राज्य परिवहन महामंडळाच्या नव्या आदेशानुसार 2018-2019 मधील उर्वरीत शैक्षणिक वर्षार्पयत मासिक पासधारक विद्याथ्र्याकडून 33.33 टक्के रक्कमदेखील वसूल केली जाणार नसल्याचे नमूद आह़े त्यामुळे साहजिकच 15 एप्रिल 2019 र्पयत मासिक पासधारक विद्याथ्र्याना मोफत शैक्षणिक प्रवासासाठी पासेस् देण्यात येणार आहेत़ दुष्काळामुळे  विद्याथ्र्याच्या शिक्षणावर दुष्परिणाम व्हायला नको म्हणून महामंडळाकडून मासिक पासधारक विद्याथ्र्याना मोफत पासेस् देण्यात येत आहेत़
जिल्ह्यात नंदुरबार, शहादा, तळोदा व नवापूर हे चार तालुके दुष्काळी जाहिर करण्यात आलेले आहेत़ त्यामुळे या तालुक्यातून ग्रामीण भागात शिक्षणानिमित्त ये-जा करणा:या मासिक पासधारक विद्याथ्र्याना या सवलतीचा लाभ मिळणार आह़े
तालुकानिहाय मासिक पासधारक विद्याथ्र्याची संख्या - नंदुरबार 7 हजार 400, शहादा 10 हजार,  तळोदा 737, नवापूर 1 हजार 850 इतकी मासिक पासधारक विद्याथ्र्याची संख्या आह़े 
दरम्यान, ही सवलत केवळ मासिक पासधारक विद्याथ्र्यासाठी असून जे विद्यार्थी पहिल्यांदाच नव्याने शैक्षणिक पास काढणार असतील त्यांच्यासाठी या सवलतीचा लाभ नसल्याचे परिवहन महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आह़े तसेच शिक्षणानिमित्त ग्रामीण भागात अप-डाऊन करणा:या विद्याथ्र्यानाच याचा लाभ मिळणार असून शहरी भागात याचा लाभ मिळणार नाही़ या शिवाय अहिल्याबाई होळकर, मानवविकास बसेस् आदी सवलतीदेखील कायम असल्याचे परिवहन महामंडळाकडून सांगण्यात आले आह़े 
 

Web Title: Twenty thousand students of Nandurbar district pass on a discount