20 हजार अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 12:57 PM2019-11-18T12:57:06+5:302019-11-18T12:57:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जुलै ते सप्टेंबर दरम्यान अतीवृष्टीमुळे बाधित झालेल्या 20 हजार शेतक:यांना सुमारे 38 कोटी रुपयांचा ...

Twenty thousand rainfed farmers wait for help | 20 हजार अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

20 हजार अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जुलै ते सप्टेंबर दरम्यान अतीवृष्टीमुळे बाधित झालेल्या 20 हजार शेतक:यांना सुमारे 38 कोटी रुपयांचा भरपाई देण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने ऑक्टोबर महिन्यात विभागीय आयुक्त यांच्याकडे दिला आह़े या प्रस्तावाची अद्यापही शासनाने दखल घेतलेली नसल्याने शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत़               
जिल्ह्यात यंदा दमदार पावसामुळे 2 लाख 88 हजार 804 हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली होती़ सरासरीच्या 108 टक्के पेरण्या पूर्ण झाल्याने शेतक:यांमध्ये समाधान होत़े दरम्यान जुलै ते सप्टेंबर या काळात जिल्ह्यातील विविध भागात अतीवृष्टी  झाल्याने कोरड आणि बागायती पिके नुकसानीच्या गर्तेत सापडली होती़  ब:याच ठिकाणी शेतातील माती आणि पिक वाहून गेल्याचे कृषी आणि महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यातून समोर आले होत़े  ऑक्टोबर मध्यार्पयत पंचनामे सुरु असलेले पंचनामे पूर्ण झाल्यानंतर 13 हजार 101 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे देण्यात आला होता़ निवडणूकीपूर्वी झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांचा अहवाल शासनाकडे पाठवला गेला होता़ निवडणूकीनंतर त्यावर कार्यवाही होण्याची शक्यता होती़ परंतू ती झाली नाही़ तूर्तास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने राज्यपालांनी अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीसाठी 8 हजार हेक्टरी मदत जाहिर केली आह़े परंतू अतीवृष्टीतील बाधित शेतक:यांना मदत देण्याबाबत अद्याप कोणतीही घोषणा झालेली नसल्याने शेतक:यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े महसूल आणि कृषी विभागाच्या पथकांनी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात केलेल्या या पंचनाम्यांमध्ये बराच घोळ असल्याचे दिसून आले होत़े अतीवृष्टीमुळे जिल्ह्यात किमान 1 लाख हेक्टर शेतजमिन आणि पिकांचे नुकसान झाल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात आले होत़े प्रत्यक्ष पंचनाम्यांमध्ये मात्र फक्त 13 हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याची माहिती पंचनाम्यांमधून समोर आली़ सर्वच तालुक्यात वेळोवेळी 62 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्यानंतर नुकसानीच्या क्षेत्रात वाढ होऊनही योग्य ती कारवाई झालेली नसल्याचे शेतक:यांचे म्हणणे आह़े प्रशासनाकडे क्षेत्रनिहाय अतीवृष्टीची नोंद आह़े पंचनाम्यांच्या अहवालानुसार अतीवृष्टीबाधित 20 हजार 155 शेतक:यांना या पुढे मदत कशी मिळणार याकडे संबधितांचे लक्ष लागून आह़े 
कृषी विभागाच्या अहवालानुसार जुलै ते सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात 12 हजार 991 शेतक:यांच्या 7 हजार 440 हेक्टर कोरडवाहू तर बागायत क्षेत्रातील 7 हजार 164 शेतक:यांच्या 5 हजार 661 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आह़े त्यांच्यासाठी 38 कोटी 15 लाख 41 हजार रुपयांची मदत प्रस्तावित आह़े ही मदत मिळणार कधी याकडे शेतक:यांचे लक्ष लागून आह़े  नंदुरबार तालुक्यातील 804 शेतक:यांना 4 कोटी 37 लाख 76 हजार, नवापुर तालुक्यात 609 शेतक:यांना 68 लाख 90 हजार, अक्कलकुवा 3320 शेतक:यांना 45 लाख 29 हजार, शहादा- 5 हजार 619 बाधित शेतक:यांना 6 कोटी 40 लाख 19 हजार, तळोदा - 2 हजार 339 शेतक:यांना 2 कोटी 15 लाख 4 हजार तर धडगाव तालुक्याच्या 210 शेतक:यांना 1 कोटी 10 लाख 26 हजार रुपयांची मदत प्रस्तावित आह़े
नंदुरबार तालुक्यात 2 हजार 145, नवापुर तालुक्यात 337, अक्कलकुवा 222, शहादा 3 हजार 138, तळोदा 1 हजार 56 तर धडगाव तालुक्यात 540 हेक्टर शेतजमिनीचे अतीवृष्टीमुळे नुकसान झाले असल्याचे अहवालात म्हटले आह़े 
सप्टेंबर अखेरीस पाठवलेल्या या प्रस्तावानंतरही काही ठिकाणी अतीवृष्टी झाल्याने त्यांचे पंचनामे झालेले नसल्याची माहिती आह़े 

Web Title: Twenty thousand rainfed farmers wait for help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.