बैल बाजारात दीड कोटींची उलाढाल

By Admin | Updated: May 9, 2017 12:38 IST2017-05-09T12:38:35+5:302017-05-09T12:38:35+5:30

बैल बाजारासाठी खान्देशात प्रसिध्द असलेला कालिका मातेच्या यात्रोत्सवात यंदा साधारण दीड कोटी रुपयांची उलाढाल झाली़

The turnover of bullocks in one and a half million | बैल बाजारात दीड कोटींची उलाढाल

बैल बाजारात दीड कोटींची उलाढाल

 तळोदा, जि.नंदुरबार, दि.9- बैल बाजारासाठी संपूर्ण खान्देशात प्रसिध्द असलेला येथील  कालिका मातेच्या यात्रोत्सवात यंदा बैलांची आवक कमी झाली असली  तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी उलाढाल चांगली झाली़ साधारण दीड कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सूत्रांनी दिली़

अक्षय्य तृतीयेनंतर शेतक:यांच्या खरीप हंगामास सुरुवात होत असत़े त्यामुळे शेतकरीदेखील या यात्रेत बैल खरेदी करीत असतात़ तळोद्याच्या कालिका मातेचा यात्रोत्सवसुध्दा संपूर्ण खान्देशात प्रसिध्द आह़े यंदाही येथील बाजार समितीच्या मालकीचा पेठे ग्राऊंडवर बैलबाजार भरला होता़ यात्रोत्सवात या वर्षी साधारण 1 हजार 300 बैलांची आवक झाली होती़ त्यापैकी जवळपास 900 बैलांची विक्री झाली. बैल खरेदी विक्रीच्या व्यवहारातून दीड कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती समितीच्या सूत्रांकडून मिळाली़ 

Web Title: The turnover of bullocks in one and a half million

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.