पोल्टीधारकांच्या वेदनांकडे पाठ फिरवत पशुसंवर्धनमंत्री परस्पर रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:58 IST2021-02-06T04:58:53+5:302021-02-06T04:58:53+5:30
नंदुरबार : राज्याचे पशुसंवर्धव, दुग्धविकासमंत्री सुनील केदार हे शुक्रवार, ५ रोजी दिल्ली येथे शेतकरी आंदोलनातील मृत आंदोलनकर्ती कार्यकर्ती कुटुंबीयांच्या ...

पोल्टीधारकांच्या वेदनांकडे पाठ फिरवत पशुसंवर्धनमंत्री परस्पर रवाना
नंदुरबार : राज्याचे पशुसंवर्धव, दुग्धविकासमंत्री सुनील केदार हे शुक्रवार, ५ रोजी दिल्ली येथे शेतकरी आंदोलनातील मृत आंदोलनकर्ती कार्यकर्ती कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी आले. मात्र जिल्ह्यात येऊनही पोल्ट्रीधारक व जिल्ह्यावर बर्ड फ्लूचे गंभीर संकट असताना त्या प्रश्नाकडे पाठ फिरवत परस्पर रवाना झाल्याने त्याबाबत नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.
पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार हे शुक्रवारी आंबाबारी, ता.अक्कलकुवा येथे शेतकरी आंदोलनातील मृत आंदोलकर्त्या सीताबाई तडवी यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी आले. दुर्गम भागातील मृत महिला आंदोलनकर्त्याच्या कामाची दखल घेत स्वत: मंत्री आंबाबारी येथे आल्याने त्याबाबत जिल्ह्यात समाधान व्यक्त होत असले तरी बर्ड फ्लूचे संकट देखील गंभीर असल्याने हा प्रश्न सोडविण्यासाठी संपूर्ण जिल्हा प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत असताना त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी तसेच नुकसानग्रस्त पोल्ट्री धारकांना दिलासा देण्यासाठी ते नवापूर येथे भेट देतील, अशी अपेक्षा असताना त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.