सामूहिक शेतीतून हळद उत्पादन

By Admin | Updated: May 11, 2017 16:17 IST2017-05-11T16:17:28+5:302017-05-11T16:17:28+5:30

नंदुरबार जिल्ह्यातील पहिला प्रयोग ठरला यशस्वी

Turmeric production from collective farming | सामूहिक शेतीतून हळद उत्पादन

सामूहिक शेतीतून हळद उत्पादन

>कलसाडी, ता.शहादा येथील शेतकरी राजेंद्र रमण चौधरी, पुंजालाल गिरधर चौधरी, जयेश रवींद्र चौधरी, जयकृष्ण बुला चौधरी, भरत हरी पाटील, हेमंत नरोत्तम चौधरी, वसंत फकिरा पाटील, अनिल छोटुलाल चौधरी, प्रकाश भाईदास चौधरी, कैलास भाईदास चौधरी, उमाकांत तुकाराम चौधरी, प्रकाश माणिक चौधरी, अरविंद राजाराम चौधरी, दगडू नरसई चौधरी आदी शेतक:यांनी गट तयार केला.
नवीन पीक घेऊन नवीन काही करून दाखविण्याचा संकल्प या शेतक:यांनी केला. त्यानुसार हळदीचे पीक घेण्याचे नियोजन केले. त्यासाठी फैजपूर (सावदा) येथे हळदीची शेती कशी केली जाते, याची माहिती घेण्यासाठी हे शेतकरी  त्या भागात गेले. तेथून माहिती घेऊन त्यांनी कलसाडी परिसरात तसा प्रयोग करण्याचे ठरविले.
 
या शेतक:यांनी सावदा येथूनच पाच क्विंटल सेलम नावाच्या हळदीचे खोडं आणून लावली.  सुरुवातीला शेतकरी ओली हळद 500 ते 600 रुपये क्विंटलप्रमाणे विक्री करीत होते. यावर काही शेतक:यांनी शक्कल लढवून उत्पादित केलेल्या हळदीवर प्रक्रिया करून बाजारात विक्री केली तर नफा अधिक मिळेल, याचा अभ्यास केला. 
 
त्यानुसार 10 ते 15 शेतक:यांनी मिळून बॉईलर मशीन आणले. या बॉईलरजवळ पॉलिश मशीन सुद्धा असते. यात दोन क्विंटल ओली हळद टाकून तिला 20 ते 40 मिनिटांर्पयत शिजवून बाहेर काढून तिला 15 दिवसांसाठी पातळ कापडावर वाळविण्यासाठी टाकतात.
गेल्या वर्षी सात ते आठ हजार रुपये क्विंटल असा भाव मिळाला होता. यावर्षी मात्र पाच ते सहा हजार रुपये क्विंटल भाव मिळाला आहे. 
हळद वाळविण्यासाठी दिवस-रात्र मजूर लागतात. त्यानंतर पुन्हा हळद पॉलिश मशीनमध्ये टाकून पॉलिश करून सातारा, सांगली येथील बाजारात विक्रीसाठी नेली जाते.
 

Web Title: Turmeric production from collective farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.