शहाद्यात मुलीला पळवण्याचा प्रयत्न करणा:याला चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 13:21 IST2018-07-01T13:21:03+5:302018-07-01T13:21:14+5:30

शहाद्यात मुलीला पळवण्याचा प्रयत्न करणा:याला चोप
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील शाळेत 11 वर्षीय मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न नेण्याचा प्रयत्न करणा:या 20 वर्षीय संशयितास नागरिकांनी बेदम चोप दिला़ सलग तिस:या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा खळबळ उडाली असून दिवसभर ‘व्हायरल’ झालेल्या अफवांमुळे पालक बेचैन झाले होत़े
शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास विकास हायस्कूलमध्ये पाचवीच्या वर्गात शिकणारी 11 वर्षीय मुलगी तिच्या काकाच्या मुलासह मोहिदा रोडने शाळेकडे जात असताना जगदीश हॉस्पिटल जवळ अचानक एका मागून येऊन तिचा हात धरत पळण्यास सुरूवात केली़ या प्रकाराने भांबावून गेलेल्या मुलीने आरडाओरड केल्यानंतर रस्त्यालगतचा दुकानदार तिच्या मदतीला धावून आला़ त्याने मुलीला पळवून नेणा:यास झडप घालून पकडून ठेवत रस्त्यावरून जाणा:यांना आवाज दिला़ सुरू असलेला गोंधळ नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलीस पळवून नेण्याचा प्रयत्न करणा:या त्या युवकाला धरून मारहाण करण्यास सुरूवात केली़ या ही माहिती मोहिदा रोड परिसरातील वसाहतींमध्ये मिळाल्यानंतर गर्दी झाली़ संबधित बालिका ही मोहिदा चौफुलीजवळ राहत असल्याने तिच्या पालकांना याची माहिती देण्यात आली़ त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठल़े घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस कर्मचा:याने घटनास्थळी जाऊन संशयित आरोपीला ताब्यात घेतल़े सकाळी शाळेत जाण्याच्या वेळेत घडलेली ही घटना अवघ्या काही वेळेतच शहरात व्हायरल झाली होती़ यानंतर दिवसभर शहरात ही एकच चर्चा सुरू होती़ बालिकेस पळवून नेण्याचा प्रयत्न करणा:या युवकाचे नाव सुकलाल शेल्या पावरा रा़ वलवाड ता़ धडगाव असे आह़े तो गेल्या काही महिन्यांपासून लोणखेडा ता़ शहादा येथे मजूरीसाठी वास्तव्यास आह़े त्याने सकाळी गांजा ओढल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले आह़े त्याच्याविरोधात 11 वर्षीय बालिकेने दिलेल्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
संशयित सुकलाल याची पोलीसांकडून कसून चौकशी सुरू असून त्याच्या कुटूंबियांसोबतही संपर्क करण्यात येत होता़