ट्रूनेट मशिनची चाचणी यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 12:24 IST2020-07-10T12:24:30+5:302020-07-10T12:24:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तींची स्वतंत्रपणे स्वॅब टेस्ट करण्यात यावी, यासाठी शासनाने जिल्हा रुग्णालयात ...

ट्रूनेट मशिनची चाचणी यशस्वी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तींची स्वतंत्रपणे स्वॅब टेस्ट करण्यात यावी, यासाठी शासनाने जिल्हा रुग्णालयात प्रयोगशाळा मंजूर केली आहे़ यांतर्गत शासनाने जिल्हा रुग्णालयात दिलेल्या ट्रूनेट मशिनची चाचणी पूर्ण झाली असून आता फक्त आयसीएमआर या संस्थेची परवानगी आवश्यक आहे़
जिल्हा रुग्णालयात कोविड टेस्टींग लॅब सुरु करण्याची सातत्याने मागणी होत होती़ या मागणीनुसार शासनाने ट्रूनेट मशिन मंजूर करुन ते पाठवूनही दिले होते़ सिंधुदुर्ग येथून गेल्या आठवड्यात निघालेले मशिन शनिवारी हे मशिन जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहे़ मशिन दाखल झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या महिला रुग्णालयात कोविड टेस्टींग लॅब तयार करुन तेथे मशिन ठेवण्यात आले आहे़ याच ठिकाणाहून यापुढे कोविड स्वॅब तपासून त्याचे रिपोर्ट देण्यात येणार आहेत़ गेल्या आठवड्यापासून येथे मशिन आल्यावर लॅब सुरू करण्यासाठी मशिन कार्यान्वित होणे आवश्यक होते़ यानुसार गुरूवारी मशिन पुरवठा करणाऱ्या कंपनीने इंजिनियर पाठवून दिला होता़ संबधित कर्मचाºयाने लॅबमध्ये नियुक्त करण्यात येणाºया कर्मचाऱ्यांना एक दिवस पूर्णपणे प्रशिक्षण दिले आहे़ यांतर्गत मशिन सुरू करण्यासह स्वॅब कसे तपासावेत याचीही माहिती देण्यात आली आहे़ या प्रशिक्षण कार्यक्रमानंतर कोविड टेस्टींग लॅब पूर्णपणे तयार करुन सज्ज ठेवण्यात आली आहे़ जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून पुढील आठवड्यात जिल्ह्यातील रुग्णांचे स्वॅब येथेच तपासले जातील असे खात्रीशीरपणे सांगण्यात आले आहे़
इंजिनियर येऊन मशिनची तपासणी करुन गेला आहे़ सर्व कर्मचाऱ्यांना याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे़ आयसीएमआरने परवानगी दिल्यावर तातडीने लॅबचे कामकाज सुरु होईल, येत्या चार ते पाच दिवसात कोविड टेस्टींग करता येईल, आयसीएमआरच्या पत्राकडे लक्ष लागून आहे़
-डॉ़ आऱडी़भोये, जिल्हा शल्यचिकित्सक,
जिल्हा रुग्णालय, नंदुरबाऱ
साधारण तीन शिफ्टमध्ये या लॅबमधून कामकाज होण्याची शक्यता आहे़ एकावेळी ३० पेक्षा अधिक स्वॅब तपासणी शक्य होणार आहे़ या स्वॅबचा अहवाल एकाच दिवसात येणार आहे़ स्वॅब टेस्टींग साठी टेस्टींग कीटचा पुरवठाही करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़
धुळे येथे स्वॅब पाठवून तेथील रिपोर्टसाठी ४८ तास वाट बघावी लागत होती़ नंदुरबारात लॅब तयार झाल्यानंतर हा वेळ कमी होणार आहे़
जिल्ह्यात पाठवण्यात आलेल्या ट्रूनेट मशिनवर कोविड टेस्ट करण्यासाठी आयसीएमआर अर्थात इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद) यांंची परवानगी आवश्यक आहे़ यासाठी जिल्हा रुग्णालयाने आयसीएमआरकडे मशिन सुरू करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे़ याला येत्या चार दिवसात उत्तर येईल अशी माहिती देण्यात आली आहे़ दरम्यान जिल्हा रुग्णालयातील लॅब साठी रुग्णालयाची १५ प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़