विदेशी मद्य भरलेला ट्रक उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 12:16 IST2020-06-02T12:12:31+5:302020-06-02T12:16:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : विदेशी मद्य भरलेला एक ट्रक भरवस्तीत शहराच्या मध्यभागातुन वाहत असलेल्या नाल्यात सायंकाळी उलटला. नागरिकांसाठी ...

A truck full of foreign liquor overturned | विदेशी मद्य भरलेला ट्रक उलटला

विदेशी मद्य भरलेला ट्रक उलटला

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : विदेशी मद्य भरलेला एक ट्रक भरवस्तीत शहराच्या मध्यभागातुन वाहत असलेल्या नाल्यात सायंकाळी उलटला. नागरिकांसाठी हा विषय कुतुहलाचा ठरल्याने घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
लॉकडाऊनमधील मिळालेली शिथीलता ताजी असतांना ही घटना सोमवारी शहराच्या भरवस्तीत घडली. नारायणपुर रोडला लागून असलेल्या शास्त्रीनगर भागात पालिकेचे बांधकाम पूर्ण होवून वापरात न आलेले व्यापारी संकुल आहे. त्याला लागून हा ट्रक क्रमांक जीजे १८- ९७९० नाल्याच्या कडेवरून घसरून नाल्यात उलटला. या वेळी ट्रकी चाकेवर व डोके खाली अश्या स्थितीत ट्रक उलटल्याने त्यातील इम्पेरीयल ब्लु नावाची दारू भरलेली खोके खाली पडले. भरवस्तीत ट्रक पलटी होवून झालेल्या आवाजामुळे घरात असलेल्या नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. दारूचे बॉटल भरलेले खोके नागरिकांच्या नजरेत पडल्यावर ही बाब शहरात वाऱ्यासारखी पसरली.
सर्वसामान्य जनतेसाठी ही घटना कुतुहलाची ठरल्याने शहराच्या प्रत्येक भागातून नागरिकांनी घटनास्थळी हजेरी लावली. सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज महाजन व पोलीस उपनिरीक्षक नासीर पठाण यांनी सहकारी कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळी धाव घेतली. नाल्यातून पाणी वाहत असल्याने पलटी झालेल्या ट्रक मधील दारू साठा बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी खाजगी लोकांच्या मदतीने प्रयत्न सुरू केले होते. ट्रक उलटल्यानंतर भांबावलेल्या ट्रक चालकाने तेथून पोबारा केल्याने ट्रकमधील दारूबाबत रहस्य वाढले होते. उपस्थित पोलीस अधिकाºयांनाही काहीच न समजल्याने दारूचा साठा बाहेर काढून त्याची मोजदाद केल्यानंतरच सविस्तर तपशील समजणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा दारु साठा वैध आहे की, अवैध याबाबतचा गुंता त्यानंतरच सुटणार आहे. रात्री उशिरा गुन्ह्यांची नोंद करण्यात येईल असे नवापूर पोलसांनी सांगितले.
या ट्रकचा संशय आल्याने पोलीस उपनिरीक्षक नासीर पठाण यांनी ट्रकचा पाठलाग सुरू केला. पोलीस आपला पाठलाग करीत असल्याचे ट्रक चालकाच्या लक्षात आल्याने तो ट्रक राष्ट्रीय महामार्गावरून करंजी ओवारामार्गे गावात आला. नारायणपूर रोडवरून शास्त्री नगरमार्गे पसार होत असताना चालकाचा नाल्याजवळ नियंत्रण सुटल्याने ट्रक नाल्यात पलटी झाला व चालक पसार झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी दिली. ही दारू कुणाची, ट्रक कुणाचा, चालक कुठं गेला, मद्यसाठा अवैध की, वैध याबाबत अद्याप माहिती मिळाली नसून लवकरच त्याचा उलगडा होईल असे ते म्हणाले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज महाजन करीत आहेत.

Web Title: A truck full of foreign liquor overturned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.