अक्कलकुवा शहरातील दुभाजकावर ट्रक आदळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 12:51 IST2020-07-03T12:51:34+5:302020-07-03T12:51:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : शेवाळी ते नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गावरील अक्कलकुवा शहरातून जाणाऱ्या मार्गावर पहाटेच्या सुमारास पोलीस ठाण्यासमोरील ...

अक्कलकुवा शहरातील दुभाजकावर ट्रक आदळला
लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : शेवाळी ते नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गावरील अक्कलकुवा शहरातून जाणाऱ्या मार्गावर पहाटेच्या सुमारास पोलीस ठाण्यासमोरील दुभाजकावर ट्रक आदळल्याने ट्रकचे किरकोळ स्वरूपात नुकसान झाले आहे.
अक्कलकुवा शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजक रात्रीच्या अंधारात समोरून येणाºया वाहनाच्या प्रकाशात लक्षात येत नसल्यामुळे वाहने दुभाजकावर जाऊन आदळत असतात तर काही वाहने उलटून अपघात घडत असतात. त्यामुळे संबधित विभागाकडून मोलगी नाका ते तहसीलदारांच्या निवासस्थानापर्यंत असलेल्या या दुभाजकावर दुभाजक दिसेल असे काहीच उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याने वाहनधारकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तरी संबंधित विभागाने मोलगी नाका ते तहसीलदारांच्या निवासस्थानापर्यंत असलेल्यादुभाजकावर लाल रंगाचे पट्टे किवा वाहन चालकांना दुभाजक दिसेल उशी उपाययोजना करण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.