खापर येथे मोकाट गुरे व वराहांचा त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:35 IST2021-08-25T04:35:31+5:302021-08-25T04:35:31+5:30
खापर गावात वराहांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून ते गावभर मोकाट फिरतात. त्यांच्यामुळे मोकळ्या जागांवर ठिकठिकाणी घाण होत असून त्यामुळे ...

खापर येथे मोकाट गुरे व वराहांचा त्रास
खापर गावात वराहांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून ते गावभर मोकाट फिरतात. त्यांच्यामुळे मोकळ्या जागांवर ठिकठिकाणी घाण होत असून त्यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बऱ्याचदा वराह हे बाजारपेठेतील बाजार करण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या हातातील पिशव्या हिसकावून घेत पोबारा करीत असल्याने जनता त्रस्त झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधित वराह मालकांना समज देऊन बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे. त्याचप्रमाणे गावात मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणावर झाली असून ती गावभर फिरतात. बऱ्याच वेळा ही जनावरे घरात घुसून नुकसान करतात. तसेच रस्त्याच्या मध्यभागी ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीची कोंडी होते. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष द्यावे व संबंधितांना समज देऊन या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी त्रस्त ग्रामस्थ करीत आहेत.