ट्रॉलाची कारला धडक, एक ठार, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 12:59 IST2020-08-08T12:57:11+5:302020-08-08T12:59:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहादा-प्रकाशा रस्त्यावर लांबोळा ते डामरखेडा दरम्यान १४ चाकी ट्रालाने कारला दिलेल्या धडकेत तळोदा येथील ...

Trolley hit car, killing one, injuring two | ट्रॉलाची कारला धडक, एक ठार, दोन जखमी

ट्रॉलाची कारला धडक, एक ठार, दोन जखमी


लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहादा-प्रकाशा रस्त्यावर लांबोळा ते डामरखेडा दरम्यान १४ चाकी ट्रालाने कारला दिलेल्या धडकेत तळोदा येथील युवक ठार झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर युवकाला धुळे येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
मोहित सुशील सूर्यवंशी असे मयत युवकाचे नाव आहे तर वासुदेव जव्हेरी व सुनील चित्ते हे दोनजण जखमी झाले. अपघात घडल्यानंतर ट्रक चालक ट्रक सोडून फरार झाला आहे. या अपघाताची भीषणता एवढी भयावह होती की अपघातग्रस्त कारच्या पुढील भागाचा पूर्ण चेंदामेंदा झाला असून संपूर्ण आॅईल रस्त्यावर सांडले होते.
गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शहाद्या कडून तळोद्याकडे जाणारी इंडिका कार (क्रमांक एमएच ०६ डब्ल्यू ६१९५) हिला प्रकाशा कडून येणाऱ्या १४ चाकी ट्रॉलाने (एमएच २० एजी ४१००) यांच्यात समोरासमोर धडक होवून अपघात घडला या अपघातात इंडिका कार चालक मोहित सुशील सूर्यवंशी (१८) हा जागीच ठार झाला होता तर त्याच्यासोबत चे वासुदेव संतोष जव्हेरी (१९) व तेजस सुनील चित्ते हे गंभीर जखमी झाले होते.
भररस्त्यावर दोन वाहनांच्या धडकेमुळे झालेल्या आवाजाने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता तेथे त्यांना हृदयद्रावक चित्र दिसले. नागरिकांनी पोलिसांना खबर देण्यासह अपघातग्रस्त वाहनातील जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. यात इंडिका कार मधील मोहित सूर्यवंशी हा मयत झाल्याचे लक्षात आल्यानंतर वासुदेव व तेजसला नागरिकांनी शहादा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.
लांबोळा ते डामरखेडा दरम्यान अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर तिघे युवक हे तळोदा येथील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी रात्री उशिरा शहादा येथे धाव घेतली.
 

Web Title: Trolley hit car, killing one, injuring two

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.