तळोदा तालुक्यात लहान मुलांच्या ओपीडीत तिप्पट वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:32 IST2021-08-26T04:32:30+5:302021-08-26T04:32:30+5:30
तळोदा : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट घोंगावत असतानाच वातावरणातील बदलामुळे लहान मुलांची तब्बेत बिघडण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. कारण जिल्हा ...

तळोदा तालुक्यात लहान मुलांच्या ओपीडीत तिप्पट वाढ
तळोदा : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट घोंगावत असतानाच वातावरणातील बदलामुळे लहान मुलांची तब्बेत बिघडण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. कारण जिल्हा रूग्णालयाबरोबरच खासगी दवाखान्यात उपचारासाठी बालकांची ओपीडीत तिप्पट वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. कोरोना या जागतिक महामारीची दुसरी लाट अजून पूर्णपणे कमी झालेली नाही. त्यातच तिसऱ्या लाटेच संकट घोंगावत आहे. त्याचा अधिक फटका लहान मुलांना बसण्याचा कयास बांधला जात आहे.
विशेषत: पावसाळ्यामुळे वातावरणातील बदलाने वायरल इन्फेक्शन वाढले आहे. त्यामुळे साथीचे आजार वाढत आहेत. लहान मुलांची तब्येत बिघडण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्हा रुग्णालयाबरोबर खासगी दवाखान्यांमध्ये अशा आजारी बालकांच्या ओपीडीत तिप्पट वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यातच कोरोनाच्या संभाव्य लाटेबाबत अधिक दक्ष राहण्याची गरज आहे.
डेंग्यू-मलेरियाची चाचणी
सद्याच्या वातावरणीय बदलामुळे मुख्यतः मलेरिया, टायफॉइड अशा रुग्णांची संख्याच अधिक वाढली आहे. जिल्हा रूग्णालयाच्या सूत्रानुसार साधारण ८७ मुलांची या महिन्यात डेंग्यू, मलेरियाची चाचणी घेण्यात आली आहे. त्यातील १२ मुळे पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले आहे.
५० टक्के मुलांची कोरोना चाचणी
जिल्हा रुग्णालयात उपारासाठी दाखल होणाऱ्या ५० टक्के मुलांची कोरोणा चाचणी केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेषत: ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असलेल्या या महिन्यातील १०७ बालकांची आरटीपीसीआर करण्यात आली होती. त्यातील एकही पॉझिटिव्ह नसल्याचे सांगण्यात आले आहे.
ही काळजी घ्या.
पावसाचे दिवस असल्यामुळे मुख्यतः घरात स्वच्छता पाळा, शिवाय आपला परिसर स्वच्छ ठेवा. डास, मच्छर प्रतिबंधासाठी औषध फवारणी करावी, पालक वर्गाने आपल्या लहान मुला-मुलींना उघड्यावरील पदार्थ खाऊ घालू नये, विशेषत: फास्ट फूड सारखे ॲटम्स टाळावे, ज्यामुळे स्थूलपणा टाळता येईल, कोरोणाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचे संकट लक्षात घेवून पालकांनी आपल्या मुलांना गर्दीच्या ठिकाणी नेऊ नये, बाहेर जाताना मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा.
बालरोगतज्ज्ञ म्हणतात
सद्या वातावरणीय बदलामुळे वायरल इन्फेक्शन वाढले आहे. साहजिकच साथीचे रुग्णदेखील वाढले आहे. विशेषत: पालकांनी स्वच्छता राखून लहान मुलांना उघड्यावरील पदार्थ खाऊ देऊ नये. तसेच फास्ट फूड खाणे टाळावे. डॉ.चेतन पाटील, बालरोग तज्ज्ञ, तळोदा.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांनी लहान मुलांना बाहेर गर्दीच्या ठिकाणी घेऊन जाऊ नये. अपवादात्मक परिस्थितीत नेलेच तर मास्क लावावे. अनेक दिवसापासून ताप, खोकला असेल तर कोरोना चाचणी करून घ्यावी. जेणेकरून लवकर उपचार करता येईल. डॉ.चेतन वळवी, बालरोग तज्ञ, जिल्हा रुग्णालय, नंदुरबार