प्रकाशा येथे भोई समाजाची त्रैवार्षिक सर्वसाधारण सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 12:52 IST2019-12-21T12:52:12+5:302019-12-21T12:52:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : जिल्हा भोई समाज सेवा संघाची त्रैवार्षीक सर्वसाधारण सभा प्रकाशा येथे पार पडली. यात सामाजिक ...

Triennial General Meeting of Bhoi Community at Prakash | प्रकाशा येथे भोई समाजाची त्रैवार्षिक सर्वसाधारण सभा

प्रकाशा येथे भोई समाजाची त्रैवार्षिक सर्वसाधारण सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : जिल्हा भोई समाज सेवा संघाची त्रैवार्षीक सर्वसाधारण सभा प्रकाशा येथे पार पडली. यात सामाजिक विषयांवर चर्चा करण्यात आली.
सभेत जिल्हाध्यक्ष लक्ष्मण वाडिले, कार्याध्यक्ष जयंतीलाल खेडकर, योगेश खेडकर, सुपडू खेडकर, प्राचार्य रामदास मोरे, महेंद्र साठे, दिनकर बेंद्रे, मंगा साठे, अशोक शिवदे, नगरसेवक संजय साठे, नरेंद्र वाडिले, गजानन निकवाडे, भिकचंद शिवदे, संजय खेडकर, चंद्रवदन मोरे, रमण ढोले, धनलाल शिवदे, संजय साठे, महेंद्र बोरदे, मिलिंद वाडिले, गणेश शिवदे, पंकज शिवदे, उत्तम जावरे, संदीप ढोले, पंडित भोई आदी उपस्थित होते. दरम्यान प्रा. रवींद्र वानखेडे यांनी अहवाल वाचन केले. दिनेश वाडेकर, प्रकाश वानखेडे, गुलाबराव सोनवणे, जितेंद्र ढोले, संदीप ढोले, रमेश वाडिले यांनी मनोगत व्यक्त केले.संत भीमा भोई यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अहवाल वाचन सरचिटणीस प्रा. रवींद्र वानखेडे यांनी केले.सोबतच जमा खर्च अहवालही त्यांनी सादर केला.त्याला सढेने मंजुरी दिली. यावेळी विविध महत्वपूर्ण विषयांवर विचार विनिमय करण्यात आला.आर्थिक व विविध महत्वपूर्ण व्यवहार करणेसाठी नोंदणीकृत भोई समाज विकास मंडळाची स्थापना करणे. समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी संघटितपणे काम करावे. वधू-वर परिचय सोबतच सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करणे असे आवाहन जिल्हाध्यक्ष वाडिले यांनी केले.दिनेश वाडेकर, प्रकाश वानखेडे,गुलाबराव सोनवणे, जितेंद्र ढोले, संदीप ढोले, रमेश वाडिले आदींनी मनोगत व्यक्त केले. सभेत नवीन कार्यकारिणीही गठीत झाली त्यात जिल्हाध्यक्षपदी संतोष वानखेडे , कार्याध्यक्ष जयवंत मोरे, संघटक रामकृष्ण मोरे (नंदुरबार), तंटामुक्तीचे जिल्हाध्यक्षपदी तुकाराम लांबोळे (प्रकाशा), उपाध्यक्षपदी आण्णाजी मोरे (खेतीया) यांची निवड झाली.

Web Title: Triennial General Meeting of Bhoi Community at Prakash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.