नंदुरबारात बालशहिदांना मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:37 IST2021-09-10T04:37:23+5:302021-09-10T04:37:23+5:30
१९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात नंदुरबारच्या बालशहिदांचे बलिदान संपूर्ण देशात गाजले होते. शिरीषकुमार यांच्यासह पाच बालक शहीद झाले होते. त्यांच्या ...

नंदुरबारात बालशहिदांना मानवंदना
१९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात नंदुरबारच्या बालशहिदांचे बलिदान संपूर्ण देशात गाजले होते. शिरीषकुमार यांच्यासह पाच बालक शहीद झाले होते. त्यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी नंदुरबारातील माणिक चौकात शहीद स्मारक उभारण्यात आले आहे. या ठिकाणी बुधवारी अभिवादन करण्यात आले.
शहीद स्मृतीतर्फे झालेल्या कार्यक्रमात डॉ.तात्याराव लहाने, खासदार डॉ.हीना गावित,डॉ.रागिणी पारेख, अध्यक्ष ॲड.रमणलाल शाह, संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.पीतांबर सरोदे,अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार,विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे,शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, निंबाजीराव बागुल, प्राचार्य डॉ.डी.एस. पाटील, प्रा.राजेंद्र शिंदे,प्राचार्य सतीश देवरे, प्रा.बी.एस.पाटील, कीर्ती सोळंकी, कैलास मराठे, पांडुरंग माळी, शितल पटेल, तुषार सोनवणे, मुख्याण्यापिका सुषमा शाह, सुलभा महिरे, मीनाक्षी भदाणे, एन.डी.नांद्रे, संजय शाह, जितेंद्र लुळे, प्रा.डी.डी.राठोड, प्रा.ईश्वर धामणे, प्रा.डी.व्ही.सोनवणे, मनीष शाह, मिठाराम माळी, पुरुषोत्तम काळे,आदिनी स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पोलीस दलातर्फे बॅड पथकाने हवेत तीन फायरिंग करून शहिंदाना मानवंदना दिली.