शहादा येथे विविध ठिकाणी बाबासाहेबांना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:29 AM2021-04-15T04:29:13+5:302021-04-15T04:29:13+5:30

दरम्यान, महसूल,पालिका प्रशासन व पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीने येथील जुन्या तहसील कार्यालय परिसरात असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन ...

Tribute to Babasaheb at various places at Shahada | शहादा येथे विविध ठिकाणी बाबासाहेबांना आदरांजली

शहादा येथे विविध ठिकाणी बाबासाहेबांना आदरांजली

googlenewsNext

दरम्यान, महसूल,पालिका प्रशासन व पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीने येथील जुन्या तहसील कार्यालय परिसरात असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, मुख्याधिकारी राहुल वाघ, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत धुमरे, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, तहसीलदार डॉ.मिलिंद कुळकर्णी, माजी उपनगराध्यक्ष अरविंद कुवर, सुरेंद्र कुवर, नगरसेवक प्रशांत निकुंभे, अनिल कुवर, सुनील शिरसाठ, सुनील गायकवाड, रवि मोरे, अनिल भामरे, अशोक मुकुरंदे, ईश्वर पाटील, अधियंता सचिन पगारे, गजेंद्र निकम, महेंद्र कुवर, मकसूद खाटीक, प्रा.विष्णू जोंधळे, प्रा.नेत्रदीपक कुवर, बापू घोडराज, जगदीश जयस्वाल, सलाउद्दीन लोहार आदींची उपस्थिती होती.

प्रा.विष्णू जोंधळे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा.संजय निकुभे यांनी सामूहिक बुद्ध वंदनेचे पठन करून मान्यवरांनी बाबासाहेबांना वंदन केले. दरम्यान, बोधीवृक्ष परिसर येथे आले. यावेळी प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, मुख्याधिकारी राहुल वाघ, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत धुमरे, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, माजी उपनगराध्यक्ष अरविंद कुवर, नगरसेवक प्रशांत निकुंभे, अभियंता सचिन पगारे, अनिल कुवर, सुनील शिरसाठ, सुनील गायकवाड, रवि मोरे यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. दरम्यान, जुन्या तहसीलदार कचेरीजवळील बाबासाहेबांच्या पुतळ्यास सिद्धार्थ नगर, महालक्ष्मीनगर, नागसेननगर, पंचशील कॉलनी, बोधीवृक्ष परिसरासह विविध कॉलनीत अभिवादन केले.

Web Title: Tribute to Babasaheb at various places at Shahada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.