आदिवासी दिनी राज्यात रानभाज्यांचा महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 13:01 IST2020-07-30T13:01:36+5:302020-07-30T13:01:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रानभाज्यांची चव शहरी भागात आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी येत्या ९ आॅगस्ट रोजी आदिवासी दिनानिमित्त ...

Tribal Day Vegetable Festival in the state | आदिवासी दिनी राज्यात रानभाज्यांचा महोत्सव

आदिवासी दिनी राज्यात रानभाज्यांचा महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : रानभाज्यांची चव शहरी भागात आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी येत्या ९ आॅगस्ट रोजी आदिवासी दिनानिमित्त कृषी विभागातर्फे राज्यात रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. या निमित्ताने ग्रामीण भागात राहणाऱ्या बांधवांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. या भाज्या व दुर्गम भागात आढळणारी फळे आरोग्याच्या दृष्टीनेदेखील उपयुक्त असल्याने त्याची ओळख जनतेला होणे आवश्यक असल्याची माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी येथे अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली.
दरम्यान, शेतकºयांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी विशेष प्रयत्न करावे आणि बँकेत येणाºया शेतकºयाला योग्य मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कृषी विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार मंजुळा गावीत, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राम रघुवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर आदी उपस्थित होते.
या वेळी मंत्री दादा भुसे म्हणाले की, शासनाने शेतकºयांना नव्याने कर्ज मिळावे व तो संकटातून सावरावा यासाठी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकºयांचे कर्ज माफ केले आहे. बँकांनी कर्जमुक्त झालेल्या शेतकºयांना नव्याने कर्ज देणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने बँकांनी सहकार्याची भूमीका घेवून ग्रामीण शेतकºयांना मदत करावी व वेळेवर कर्ज उपलब्ध करून द्यावे.
दरम्यान, जिल्ह्यात मनरेगा, सार्वजनिक वितरण प्रणाली आणि पीएम किसान योजनेंतर्गत चांगले काम झाल्याबद्दल भुसे यांनी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले. संकटाच्या काळात जिल्ह्याने चांगली कामगिरी केल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यातील सर्व शेतकºयांकडून कापूस खरेदी केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. जिल्हाधिकारी डॉ.भारूड यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील पीक परिस्थिती, खत उपलब्धता, शेतकºयांसाठी विविध योजना, पीक कर्ज वाटप बाबत माहिती दिली.

मनरेगाच्या माध्यमातून सिंचन विहीर आणि शेततळे तयार करण्यावर भर देण्यात येईल. शेततळ्याच्या अस्तरीकरणासाठी कृषी विभागाकडून सहकार्य केले जाईल. फळबाग लागवडीला प्रोत्साहन देताना स्थानिक वातावरणास पोषक फळझाडांची निवड करावी, असे त्यांनी सांगितले. पीएम किसान योजनेचा अधिकाधीक शेतकºयांना लाभ होण्यासाठी १५ दिवस विशेष मोहिम राबविण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

युरियाचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी केंद्रीय मंत्र्यांकडे विनंती केली आहे. शासन स्तरावर त्याबाबत प्रयत्न होत आहे. कोरोनाच्या संकटामुळे काही ठिकाणी वाहतुकीस विलंब होत आहे. मात्र येत्या आठवड्यात खताचा पुरवठा सुरळीत होईल व जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल. त्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत, असे भुसे यांनी सांगितले.

शासनातर्फे गटशेती आणि कृषी उत्पादकांची कंपनी स्थापन करण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विकेल तेच पिकेल या संकल्पनेनुसार जिल्ह्यात तयार होणाºया भगरीचे ब्रँडींग आणि आकर्षक पॅकेजींग करण्याची गरज आहे. त्यासाठी कृषी विभाग पुढाकार घेईल.

Web Title: Tribal Day Vegetable Festival in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.