आदिवासी संस्कृती जगाला प्रेरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 12:01 IST2019-12-23T12:01:02+5:302019-12-23T12:01:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आदिवासी संस्कृती ही देशाला प्रेरणा देणारी आहे़ परंतू संस्कृतीचा घटक असलेल्या आदिम समुदायाच्या समस्या ...

Tribal culture inspires the world | आदिवासी संस्कृती जगाला प्रेरणा

आदिवासी संस्कृती जगाला प्रेरणा


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आदिवासी संस्कृती ही देशाला प्रेरणा देणारी आहे़ परंतू संस्कृतीचा घटक असलेल्या आदिम समुदायाच्या समस्या ह्या ऐकून घेतल्या जात नसल्याचा सूर शहरात आयोजित जनजाती चेतना परिषदेत मान्यवरांनी व्यक्त केला़
छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय परिषदेत प्रमुख वक्ते म्हणून ट्रायफेड भारत सरकारचे चेअरमन रमेशचंद्र मिणा, जनजाती सुरक्षा मंचचे अखिल भारतीय प्रमुख हर्ष चव्हाण, प्रांत सचिव पश्चिम महाराष्ट्र शरद शेळके, इंदौर येथील पोलीस उपअधीक्षक अमृता सोलंकी उपस्थित होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉ़ हिना गावित, आमदार डॉ.विजयकुमार गावित, आमदार राजेश पाडवी, माजी आमदार डॉ.नरेंद्र पाडवी,  भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, कुवरसिंग वळवी, डॉ.कांतीलाल टाटिया, राजेंद्रकुमार गावीत, सखाराम पाडवी, देवगिरी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष चैत्राम पवार, आप की जय परिवाराचे जितेंद्र पाडवी, मौल्या गावित, डॉ.मनिष सुर्यवंशी, अ‍ॅड.सावंत वळवी, निवृत्त अधिकारी आशा पाडवी, रेखा नाईक, मीनाक्षी गवळी, सोनाली पाडवी उपस्थित होते़
यावेळी बोलताना जनजाती सुरक्षा मंचचे चव्हाण यांनी सांगितले की, जनजाती समाजाच्या समस्या कुणी ऐकू शकत नाही. त्या समस्या आजही प्रलंबित आहेत़ जनजाती समाजाची प्रतिमा आणि अवस्था यात खुप फरक आहे. समस्या वेगळ्या असून त्यावर वेगळेच समाधान केले जाते. असे न होता जनजाती समाजाविषयी असलेली विचारसरणी बदलून समस्या ज्या आहेत त्यावर योग्य समाधान व्हावे़
ट्रायफेडचे चेअरमन मीणा यांनीही आदिवासी समुदायाच्या विविध पैलंूवर प्रकाश टाकत आदिवासी संस्कृती सर्वपरीने जगाला प्रेरणा देणारी असल्याचे सांगितले़
परिषद आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.प्रकाश ठाकरे, अ‍ॅड़ भगतसिंग पाडवी, डॉ.विशाल वळवी, विरेंद्र वळवी आदींनी परिश्रम घेतले़

परिषदेच्या उद्घाटनापूर्वी अंधारे चौकातून सांस्कृतिक रॅली काढण्यात आली होती़ या रॅलीतून संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले़ मान्यवरांचाही रॅलीत सहभाग होता़

Web Title: Tribal culture inspires the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.