‘ज्येष्ठांची आठवण’ उपक्रमांतर्गत टेंभे येथे वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:35 IST2021-08-14T04:35:51+5:302021-08-14T04:35:51+5:30

यावेळी सरपंच गोपालसिंग गिरासे, तलाठी सोमनाथ जाधव, ग्रामपंचायत सदस्य आनंदा पानपाटील, दिग्विजयसिंग गिरासे, हर्षल पाटील, दिलवर मालचे, आधार भिल ...

Tree planting at Tembhe under the 'Remembrance of Seniors' initiative | ‘ज्येष्ठांची आठवण’ उपक्रमांतर्गत टेंभे येथे वृक्षारोपण

‘ज्येष्ठांची आठवण’ उपक्रमांतर्गत टेंभे येथे वृक्षारोपण

यावेळी सरपंच गोपालसिंग गिरासे, तलाठी सोमनाथ जाधव, ग्रामपंचायत सदस्य आनंदा पानपाटील, दिग्विजयसिंग गिरासे, हर्षल पाटील, दिलवर मालचे, आधार भिल उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक बापूसिंग गिरासे, करणसिंग गिरासे, दाजूसिंग गिरासे, न्हानजी पानपाटील, भिकेसिंग गिरासे, रंगराव गिरासे, संजय कोळी, दगा पानपाटील, नवलसिंग गिरासे, खंडेसिंग गिरासे यांच्या हस्ते बाभूळ, चिंच, उंबर, लिंब आदी प्रजातीच्या १०० वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरणाचे व जैवविविधतेचे जतन-संवर्धन व्हावे यासाठी लक्ष्मण पानपाटील यांनी स्व:खर्चाने वृक्षलागवड करून संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. या उपक्रमासाठी सोनूसिंग गिरासे, तन्वीरसिंग गिरासे, लक्ष्मण पानपाटील, गोपालसिंग गिरासे, अर्जुन पानपाटील, पिंटू भिल, आधार भिल, प्रल्हाद भिल, भाऊ गावीत, दुर्गेश पानपाटील, शाना कोळी, दीपकसिंग गिरासे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Tree planting at Tembhe under the 'Remembrance of Seniors' initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.