चिनोद्याजवळ पुन्हा झाड कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 13:07 IST2019-08-09T13:07:12+5:302019-08-09T13:07:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रतापपूर : तळोदा ते प्रतापपूर मार्गावर चिनोदा गावाजवळ झाड कोसळून वाहतूक बंद झाली़ मार्गावर गेल्या महिन्यात ...

चिनोद्याजवळ पुन्हा झाड कोसळले
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रतापपूर : तळोदा ते प्रतापपूर मार्गावर चिनोदा गावाजवळ झाड कोसळून वाहतूक बंद झाली़ मार्गावर गेल्या महिन्यात झाड कोसळून वाहतूक बंद झाली होती़
चिनोदा गावाजवळ रस्त्याच्या दुतर्फा वड आणि चिंचेची जुनाट झाडे आहेत़ पावसामुळे सध्या झाडांची स्थिती गंभीर झाली असून गुरुवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास यातील एक झाड कोसळल्याने चारचाकी वाहनांची वाहतूक बंद झाली़ प्रतापपूर ते तळोदा दरम्यान धावणा:या बसेस बंद झाल्याने विद्याथ्र्याचे हाल झाल़े झाड बाजूला करण्यासाठी दिवसभरात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीच न फिरकल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े झाड पूर्णपणे बाजूला काढल्याशिवाय वाहतूक सुरु होणार नसल्याने शुक्रवारी सकाळीही बसेसची वाहतूक सुरु होऊ शकणार नसल्याची माहिती देण्यात येत आह़े गुरुवारी सायंकाळी एसटीने घरी परतणा:या विद्याथ्र्याचे हाल झाले होत़े