जीव मुठीत धरुन नदीतून प्रवास..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 12:43 IST2019-07-28T12:43:48+5:302019-07-28T12:43:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ब्रामणपुरी : धडगाव तालुक्यातील बिलगावहून साव:या दिगर-भोमनाकडे जाणा:या मार्गावर उदय नदीवरील पुलाचे काम गेल्या तीन ते ...

जीव मुठीत धरुन नदीतून प्रवास..
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रामणपुरी : धडगाव तालुक्यातील बिलगावहून साव:या दिगर-भोमनाकडे जाणा:या मार्गावर उदय नदीवरील पुलाचे काम गेल्या तीन ते चार वर्षापासून कासवगतीने होत आहे. या नदीपात्रात पाणी आल्यास वाहतूक बंद होऊन ग्रामस्थांना जीव मुठीत धरून नदीमधून प्रवास करावा लागतो.
धडगाव तालुक्यातील बिलगावहून साव:या दिगर-भोमनाकडे जाण्यासाठी ग्रामस्थांची दळणवळण समस्या सुटावी यासाठी उदय नदीवर पूल मंजूर करण्यात आला. परंतु गेल्या तीन ते चार वर्षापासून या पुलाचे काम कासवगतीने सुरू आहे. पुलाचे काम पूर्ण होत नसल्याने पावसाळ्यात या भागातील नागरिकांना नदीमधून जीव मुठीत घेऊन पुढील प्रवास करावा लागतो. जवळच असलेल्या नर्मदा नदीच्या फुगवटय़ाचे पाणी या नदीपात्रात असते. त्यामुळे सहजासहजी पाण्याची पातळी कमी होत नाही. परिणामी परिसरातील गावांचा संपर्क तुटतो. गेल्यावर्षी भुषा पॉईंटजवळ बोटमध्ये प्रवास करीत असताना अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्याचप्रमाणे उदय नदीपात्रात जास्त प्रमाणात पाणी पातळी वाढल्यास नदीचे पात्र ओलांडण्याच्या प्रय}ात मोठी दुर्दैवी घटना घडू शकते. त्यासाठी या पुलाचे काम लवकरात लवकर करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
कामाची सध्याची स्थिती पाहता यावर्षीही परिसरातील पाडय़ांवरील नागरिकांना पायपीट करावी लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामावर निगराणी ठेवून पुलाचे काम जलद गतीने करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.